शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

हे विसरू नका...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

वातावरणही अप्रसन्न बनविते आणि त्या व्यक्तिंच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तिंवरदेखील परिणाम होतो. खरोखरच, हा जीवन जगण्याचा योग्य मार्ग नाही. आपण ...

वातावरणही अप्रसन्न बनविते आणि त्या व्यक्तिंच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तिंवरदेखील परिणाम होतो. खरोखरच, हा जीवन जगण्याचा योग्य मार्ग नाही.

आपण स्वतः शांतीपूर्ण जीवन जगणे आणि दुसऱ्यांसाठीही शांततेची निर्मिती करणे, अगत्याचे आहे. शेवटी आपण सामाजिक प्राणी आहोत, आपल्याला समाजात राहावे लागते आणि समाजातल्या अन्य व्यक्तींबरोबर परस्पारिक संबंध ठेवावे लागतात. अशा स्थितीत आपण शांतीपूर्वक जीवन कसे जगू शकतो ? कसे आपण आपल्या आतमध्ये सुख तसेच शांतीचे जीवन जगू शकतो, आणि कसे आपल्या आसपासही शांती आणि

सौमनस्याचे, सौहार्दाचे वातावरण निर्माण करू शकतो, जेणेकरून समाजातले अन्य लोकही सुख आणि शांतीचे जीवन जगू शकतील.

आपले दुःख दूर करण्यासाठी प्रथम आपल्याला हे समजून घेतले पाहिजे की, आपण अशांत व बेचैन का होतो. याकडे लक्ष देऊन पाहिले तर लक्षांत येईल की, जेव्हा मन विकारामुळे विकृत होऊन जाते तेव्हा ते मन अशांत होऊन जाते. आपल्या मनांत विकारही आहेत आणि त्याचवेळी आपण सुख तसेच शांतीचा अनुभव घेऊ, हे अशक्य आहे.

हे विकार का आणि कसे उत्पन्न होतात? पुन्हा खोलवर शोध घेतल्यास हे स्पष्ट होते की, जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला न आवडणारा व्यवहार करते किंवा जे घडते ते आपल्याला आवडत नाही, याची ती प्रतिक्रिया असते. अप्रिय घटना घडतात आणि आपण आंतरिक तणाव निर्माण करतो. मनाप्रमाणे न होण्यामुळे, किंवा मनाप्रमाणे होण्यात काही बाधा येत असेल तर आपण तणावग्रस्त होतो आणि अंतरमनांत गाठी बांधायला सुरूवात करतो. जीवनभर अप्रिय घटना होत राहतात, कधी मनाप्रमाणे होतात, कधी होत नाहीत आणि आपण जीवनभर प्रतिक्रिया करत राहतो आणि गाठी बांधत राहतो. आपले पूर्ण शरीर तसेच मन इतक्या विकारांनी, इतक्या तणावांनी भरून जाते की, आपण दुःखी होऊन जातो. या दुःखापासून वाचण्याचा एकच उपाय आहे. तो म्हणजे आपल्या आयुष्यात अप्रिय घटना घडूच द्यायची नाही, सर्वकाही मनाप्रमाणे व्हावे किंवा आपल्याला अशी शक्ती जागृत करायला हवी, किंवा अशी शक्ती असलेला दुसरा कुणी मदतकर्ता असावा जो नको असणाऱ्या घटना घडूच देणार नाही आणि आपल्याला हवे असलेलेच होत जाईल. परंतु, हे अशक्य आहे. जगामध्ये अशी एकही व्यक्ती नाही, की ज्याच्या सर्व इच्छा सर्वकाळ पूर्ण होतील. ज्याच्या आयुष्यात सर्व काही आपल्या इच्छेप्रमाणे घडत राहील, अगदी मनाविरूद्ध काहीही न होता. जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये मनाविरूद्ध घटना घडतच राहणार. अशा वेळेस प्रश्न उठतो की, विषम परिस्थिती उत्पन्न झाल्यावर आपण अंध प्रतिक्रिया देणे कसे थांबवावे? कसे आपण तणावग्रस्त न होता शांत आणि संतुलित राहू शकू? याचा विचार करून आपण प्रत्येकजण शांततेने जगायला शिकूया. आपलं जगणं किती शांततेचे आहे ते केवळ आपल्यावर अवलंबून असते. हे मात्र विसरू नका.

- डॉ. गजानन पाटील, रत्नागिरी.