डेरवण येथे २८ रोजी जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:34 IST2021-09-26T04:34:28+5:302021-09-26T04:34:28+5:30

खेड : जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने व डेरवण श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटिज ट्रस्टतर्फे भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन ...

District level cross country competition on 28th at Derwan | डेरवण येथे २८ रोजी जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा

डेरवण येथे २८ रोजी जिल्हास्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धा

खेड : जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने व डेरवण श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटिज ट्रस्टतर्फे भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत वालावलकर क्रॉसकंट्री स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा २८ रोजी सकाळी ९ वाजता डेरवण क्रीडा संकुल येथे होणार आहे. ‘रन फॉर द नेशन’ हे या स्पर्धेचे ब्रीद वाक्य आहे.

ही स्पर्धा एकूण आठ गटांत होणार असून, यामध्ये १२, १४, १६ आणि १८ वर्षांखालील मुले व मुली यांचा समावेश आहे. १२ वर्षे मुली-मुले व १४ वर्षे मुली या गटासाठी २ किलाेमीटर, १४ वर्षे मुले व १६ वर्षे मुली या गटासाठी ३ किलाेमीटर, १६ वर्षे मुले व १८ वर्षे मुली या गटासाठी ४ किलाेमीटर आणि १८ वर्षांखालील मुलांसाठी ६ किलाेमीटर अंतर ठेवण्यात आले आहे. १२ वर्षांखालील गटात २८ सप्टेंबर २००९ नंतर जन्मलेले, १४ वर्षांखालील गटात २८ सप्टेंबर २००७ नंतर जन्मलेले, १६ वर्षांखालील गटात २८ सप्टेंबर २००५ नंतर जन्मलेले आणि १८ वर्षांखालील गटात २८ सप्टेंबर २००३नंतर जन्मलेले खेळाडू भाग घेऊ शकतील.

प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाच्या स्पर्धकांना एकूण रोख ५० हजार रुपयांची बक्षिसे व पहिल्या तीन क्रमांकांना पदक देण्यात येणार आहेत. प्रवेश अर्ज डेरवण क्रीडा संकुल येथे स्वीकारण्यात येतील. स्पर्धेसाठी ऑनलाइन नावनोंदणी सुरू असून, नाव नोंदणीसाठी श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटिज ट्रस्ट क्रीडा संकुल, डेरवण येथे संपर्क साधावा.

Web Title: District level cross country competition on 28th at Derwan