शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त व्यापाऱ्यांना जिल्हा बँक ५ टक्के दराने कर्ज देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 15:12 IST

Banking Sector Flood Ratnagiri : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त व्यापाऱ्यांची सकाळी बैठक झाली. या व्यापाऱ्यांना लवकरात लवकर उभे राहण्याची संधी मिळावी, यासाठी जिल्हा बँकेकडून ५ टक्के दराने कर्जपुरवठा केला जाईल, असे डॉ. चोरगे यांनी जाहीर केल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आणि चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी मंगळवारी संयुक्तरित्या ऑलाईन आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देजिल्हा बँक अध्यक्षांबरोबर व्यापाऱ्यांची बैठक व्यापाऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी प्रयत्न

रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त व्यापाऱ्यांची सकाळी बैठक झाली. या व्यापाऱ्यांना लवकरात लवकर उभे राहण्याची संधी मिळावी, यासाठी जिल्हा बँकेकडून ५ टक्के दराने कर्जपुरवठा केला जाईल, असे डॉ. चोरगे यांनी जाहीर केल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आणि चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी मंगळवारी संयुक्तरित्या ऑलाईन आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.ढगफुटीसदृश्य झालेल्या अतिवृष्टीत चिपळुणात महाप्रलय आला. खेडही जलमय झाले. यात व्यापारी यांचे पूर्णत: नुकसान झाले असून, त्यांचा व्यवसाय उद्धवस्त झाला आहे. जिल्ह्यात सुमारे साडेसहा हजार छोटे - मोठे व्यापारी पूरग्रस्त झाले आहेत. त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी अल्पदराने कर्ज मिळण्याची गरज असल्याने तशी मागणी या व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

या अनुषंगाने या तिघांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित केली होती. व्यापाऱ्यांना सध्या अल्प व्याजदराने ५० हजार ते ५० लाखापर्यंत कर्जाची गरज आहे. त्यांना उभे राहण्यासाठी अल्प व्याजदर आणि सबसिडी शासनाकडून मिळाली तर या व्यापाऱ्यांना लवकरात लवकर आपले व्यवसाय सुरू करता येणार आहेत. यादृष्टीने आयोजित या बैठकीत डॉ. चोरगे यांनी प्रतिसाद दिल्याने त्यांना धन्यवाद देण्यात आले.याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून, या व्यापाऱ्यांना २टक्के दराने कर्ज सबसिडी मिळाल्यास त्याचा फायदा राज्यातील इतर पूरबाधित व्यापाऱ्यांनाही होईल. तसेच १ वर्षांचा मॉरेटियम लागू केल्यास त्यांना लवकर उभ राहता येईल. इतर राष्ट्रीय बँकांनीही हा फॉर्म्युला लागू करावा, यासाठी इतर बँकांशीही याबाबत बोलणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रfloodपूरRatnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत