जावडे येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:21 IST2021-07-11T04:21:48+5:302021-07-11T04:21:48+5:30

लांजा : तालुक्यातील हेरिटेज कल्चर आर्ट ॲण्ड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, जावडे तसेच प्राथमिक व ...

Distribution of educational materials at Javade | जावडे येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

जावडे येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

लांजा : तालुक्यातील हेरिटेज कल्चर आर्ट ॲण्ड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल, जावडे तसेच प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, जावडे (ता. लांजा) येथे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शिवसेनेच्या वाकेड जिल्हा परिषद गटातर्फे ब्लॅंकेट व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

लांजा पंचायत समितीच्या माजी सभापती व विद्यमान सदस्य लीला घडशी यांच्या मार्गदर्शनाखाली या साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी वाकेड गट विभागप्रमुख संतोष गुरव, उपविभागप्रमुख सुरेश सावंत, जावडेच्या सरपंच जान्हवी सोडये, पानोरेच्या सरपंच नरसाळे, मोहन घडशी, उपसरपंच चंद्रकांत गवाणकर, शाखाप्रमुख रघुनाथ नामये, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत नामये, सचिन नरसाळे, न्यू इंग्लिश स्कूल, जावडेचे मुख्याध्यापक संदेश कांबळे, माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक गजानन पांचाळ, प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक शिवप्रसाद ताटके तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Distribution of educational materials at Javade