Ratnagiri: टीडब्ल्यूजे घोटाळ्यातील संशयित संचालकाला चिपळुणात अटक, मुख्य संशयित अजूनही फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 17:33 IST2026-01-28T17:33:21+5:302026-01-28T17:33:50+5:30

पाच दिवसांची पाेलिस काेठडी

Director suspected in TWJ scam arrested, main suspect still absconding | Ratnagiri: टीडब्ल्यूजे घोटाळ्यातील संशयित संचालकाला चिपळुणात अटक, मुख्य संशयित अजूनही फरार

Ratnagiri: टीडब्ल्यूजे घोटाळ्यातील संशयित संचालकाला चिपळुणात अटक, मुख्य संशयित अजूनही फरार

चिपळूण : हजारो कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करून वर्षभरापासून फरार असलेला टीडब्ल्यूजे कंपनीचा संचालक संकेश घाग याचा शाेध घेण्यात पाेलिसांना यश आले आहे. रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि चिपळूण पाेलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत त्याला मंगळवारी चिपळुणातून अटक केली. मात्र, अद्याप मुख्य संशयित अजूनही पाेलिसांच्या हाती लागलेला नाही.

टीडब्ल्यूजे कंपनीच्या माध्यमातून आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी नव्हे, तर हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक उकळण्यात आली होती. मात्र, ठरलेल्या कालावधीनंतर ना परतावा मिळाला, ना मूळ रक्कम. त्यानंतर कंपनीचे एमडी समीर नार्वेकर, संचालक अचानक गायब झाले आणि गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक झाल्याचे उघड झाले.

टीडब्ल्यूजेच्या गुंतवणूकदारांनी वेळोवेळी आंदोलन, मोर्चे, निवेदने देत न्यायासाठी आवाज उठवला. मात्र, दीर्घकाळ कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने पैसे मिळण्याची आशा धूसर झाली हाेती. मात्र, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पाेलिस आणि चिपळूण पोलिसांनी तपासाला गती देत संकेश घाग याला शोधून काढले आणि अटक केली. टीडब्ल्यूजे घोटाळ्यातील ही अटक महत्त्वाची मानली जात असून, पुढील तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

आणखी माहिती उघड हाेणार?

टीडब्ल्यूजे घाेटाळ्यात आणखी कोणकोण सामील आहेत, कंपनीच्या आर्थिक व्यवहारांचा नेमका मागोवा काय आहे, तसेच फसवणूक केलेली रक्कम कुठे गुंतवण्यात आली, याची माहिती उघड हाेण्याची शक्यता आहे. पाेलिसांच्या तपासाला आता गती मिळणार आहे.

न्यायालयाच्या परिसरात गर्दी

संकेश घाग याच्या अटकेचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरताच चिपळूण न्यायालयाच्या परिसरात गुंतवणूकदारांनी मोठी गर्दी केली होती. अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेला हा संशयित पोलिसांच्या सततच्या शोधमोहिमेनंतर अखेर हाती लागला.

पाच दिवसांची पाेलिस काेठडी

संशयित संकेश घाग याला चिपळूण न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे. त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title : टीडब्ल्यूजे घोटाला: चिपलूण में संदिग्ध गिरफ्तार, मुख्य आरोपी अभी भी फरार

Web Summary : टीडब्ल्यूजे कंपनी का एक निदेशक, जो करोड़ों के घोटाले में वांछित था, चिपलूण में गिरफ्तार। मुख्य आरोपी अभी भी फरार है। निवेशकों को उच्च रिटर्न का वादा करके धोखा दिया गया। पुलिस जांच घोटाले और शामिल पक्षों के बारे में अधिक जानकारी उजागर करना जारी है।

Web Title : TWJ Scam: Suspect Arrested in Chiplun, Main Accused Still at Large

Web Summary : A director of TWJ Company, wanted in a multi-crore fraud, has been arrested in Chiplun. The main suspect remains absconding. Investors were duped with promises of high returns. Police investigation continues to uncover more details about the scam and involved parties.