शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

‘डिजिटल इंडिया’चा निर्णय ग्रामसभांच्या खांद्यावर

By admin | Updated: July 2, 2015 22:46 IST

कोणत्याही दिवशी गावची सभा बोलावणार

रत्नागिरी : डिजिटल इंडिया हा भारत सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, तो राज्यात ग्रामस्तरावर राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने ग्रामपंचायतींमध्ये दि. ६ ते ८ जुलै यापैकी कोणत्याही एका दिवशी विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्याची सूचना जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायतींना शासनाकडून देण्यात आली आहे. हा कालबध्द कार्यक्रम राज्य व केंद्र सरकार संयुक्तपणे राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना देण्यात आले आहेत. यामध्ये ग्रामपंचायतींची माहिती, लोकसंख्या, सरपंच, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्यांची नावे, त्यांचे मोबाईल क्रमांक, कालावधी यांची माहिती संग्राम सॉफ्टवेअरमध्ये अद्ययावत करण्यात येणार आहे. आधार क्रमांकाच्या सहाय्याने सर्वच नागरिकांना संगणकीय लॉकर्स उघडून देण्यात येणार आहे. शहर परिसरातील नागरिकांना वेळोवेळी लागणारे दाखले, महत्त्वाची कागदपत्र नागरिकांना त्यांच्या वैयक्तिक संगणकीय लॉकर्समध्ये विनामोबदला उपलब्ध करुन देण्याची सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आली आहे. या सर्व सुविधा नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याबाबतची जनजागृती व माहिती दि. ६ ते ८ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या ग्रामसभेत ग्रामपंचायतींकडून देण्यात येणार आहे. त्यामुळे डिजिटल इंडिया हा उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचणार आहे. (शहर वार्ताहर)राज्य शासनाने सन २०१५ हे वर्ष डिजिटलाईज्ड कालबध्द सेवा वर्ष २०१५ म्हणून घोषित केले आहे. यात सर्व उपक्रमांबद्दल माहिती देणे, ई-गव्हर्नन्सअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध उपक्रम एका छताखाली आणणे. यासाठी ग्रामस्थांना प्रशिक्षित करुन या उपक्रमामध्ये सहभागी करण्यात येणार आहे.