राजापूरच्या नायब तहसीलदार बिबट्याच्या हल्ल्यात जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2023 12:15 AM2023-03-01T00:15:04+5:302023-03-01T00:19:21+5:30

पंडीत या मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारस राजापूर पंचायत समितीच्या वार्षिक स्नेहसम्मेलनाच्या कार्यक्रमाला आपल्या दुचाकीवरुन निघाल्या होत्या.

Deputy Tehsildar of Rajapur injured in leopard attack | राजापूरच्या नायब तहसीलदार बिबट्याच्या हल्ल्यात जखमी

राजापूरच्या नायब तहसीलदार बिबट्याच्या हल्ल्यात जखमी

googlenewsNext

- विनोद पवार

राजापूर : येथील नायब तहसीलदार दीपाली पंडीत या रात्री साडेदहाच्या शहरातील भटाळी येथे  बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत . ज्या ठिकाणी त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला, तिथपासून राजापूर वनविभागाचे कार्यालय केवळ हाकेच्या अंतरावर आहे. येथील नागरिकानी काही दिवसांपूर्वी या भागात बिबट्या फिरत असल्याची तक्रार केली होती. मात्र वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे कानाडोळा केल्याने आज बिबट्याच्या हल्ल्यात राजापूरच्या नायब तहसीलदारच जखमी झाल्या आहेत.

पंडीत या मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारस राजापूर पंचायत समितीच्या वार्षिक स्नेहसम्मेलनाच्या कार्यक्रमाला आपल्या दुचाकीवरुन निघाल्या होत्या. त्या राजापूर पोलिस लाइनपासून काही मीटर अंतरावर असणाऱ्या भारत बेकरीच्या भट्टीजवळ आल्या असता तेथील गडग्यावर दबा धरुन बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. 

बिबट्या हल्ला करत असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी दुचाकी पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र बिबट्याने त्यांचा पाठलाग केला. त्यात त्या बालंबाल बचावल्या आहेत. त्यांच्या हातावर बिबट्याने पंजा मारला असून दुचाकीवरुन पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दरम्यान, याच रस्त्याने येणाऱ्या काही पोलिसांच्या त्या निदर्शनास आल्याने त्यांना पोलिसांनी राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे.

Web Title: Deputy Tehsildar of Rajapur injured in leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.