शेडची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:34 IST2021-09-27T04:34:32+5:302021-09-27T04:34:32+5:30

राष्ट्रीय सेवा दिन साजरा दापोली : आर.व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन संचलित न.का. वराडकर कला, रा.व्ही. बेलोसे वाणिज्य, कै.शांतीलाल जैन ...

Demand for sheds | शेडची मागणी

शेडची मागणी

राष्ट्रीय सेवा दिन साजरा

दापोली : आर.व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन संचलित न.का. वराडकर कला, रा.व्ही. बेलोसे वाणिज्य, कै.शांतीलाल जैन विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे राष्ट्रीय सेवा दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. डाॅ. संजय पाटोळे यांनी मार्गदर्शन केले.

आरक्षण उपलब्ध

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी-मडगांव, दिवा-रत्नागिरी, दिवा सावंतवाडी या तिनही गाड्यांना दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या गाड्यांचे आरक्षण रविवार (दि.२६ पासून) खुले करण्यात आले आहे. स्पेशल गाड्यांमुळे प्रवाशांची गैरसोय मात्र दूर झाली आहे.

वेळेची मर्यादा काढा

रत्नागिरी : येथील तहसील कार्यालयात रेशन कार्डावर नावांची नव्याने नोंदणी किंवा नावे कमी करणे या कामसाठी सायंकाळची वेळ निश्चित करण्यात आाली आहे. सायंकाळी एक तास देण्यात येणार असून यामुळे ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय होणार असून, वेळेची मर्यादा काढण्याची मागणी होत आहे.

Web Title: Demand for sheds