वेडसर प्रौढाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:36 IST2021-08-24T04:36:20+5:302021-08-24T04:36:20+5:30

लांजा : गेली तीन ते चार वर्षे शहरामध्ये फिरणाऱ्या ५० वर्षीय वेडसर प्रौढाचा सोमवारी आकस्मिक मृत्यू झाला. लांजा पोलिसांनी ...

Death of a cracked adult | वेडसर प्रौढाचा मृत्यू

वेडसर प्रौढाचा मृत्यू

लांजा

: गेली तीन ते चार वर्षे शहरामध्ये फिरणाऱ्या ५० वर्षीय वेडसर प्रौढाचा सोमवारी आकस्मिक मृत्यू झाला. लांजा पोलिसांनी त्यांच्या नातेवाईक यांचा शोध सुरू केला आहे.

गेली तीन ते चार वर्षांपूर्वी शहरात ५० वर्षीय वेडसर प्रौढ दाखल झाला होता. शहरातील हाॅटेल व्यावसायिक त्याला खायला द्यायचे. कोणालाही त्रास देत नसल्याने त्याला अनेक लोकांनी ‘बबलू’ या टोपणनावाने ओळखले जात होते. शहरातील अनेक ठिकाणी तो वास्तव्य करीत असे. गेली अनेक वर्षे तो शहरात राहिल्याने त्याला कोणीच त्रासही देत नव्हते. ओळखीच्या लोकांकडेच तो पैसे मागत असे. सोमवारी सकाळी १० वाजता दरम्यान शेट्ये पेट्रोल पंपासमोर असलेल्या नाईक यांच्या अर्धवट तोडण्यात आलेल्या इमारतीच्या बाजूला त्याचा मृतदेह आढळला. पोलिसांनी पंचनामा केला. त्याची ओळख पटविण्यासाठी लांजा पोलिसांनी आवाहन केले आहे.

Web Title: Death of a cracked adult