शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या धडकेने बालकाचा मृत्यू

By admin | Updated: November 1, 2015 22:59 IST

रत्नागिरी-नाटे मार्गावर अपघात

रत्नागिरी : रत्नागिरी-नाटे मार्गावर धारतळे येथे भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी चालकाने आईसोबत चालणाऱ्या ५ वर्षीय बालकाला पाठीमागून धडक दिली. या अपघातामध्ये बालक मृत झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. नागाप्पा बळतअप्पा माळीपाटील (५, ईतगिरी, कर्नाटक) असे मृत बालकाचे नाव आहे. रविवारी दुपारी नागाप्पा हा त्याची आई पाणी भरून आणत असताना तिचा हात धरून रस्त्याने जात होता. याचवेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकी (एमएच-०८-एडी-३५०७) घेऊन कयुब अब्दुल करीम (रत्नागिरी) भरधाव वेगाने येत होता. धारतळे येथे कयुबचा दुचाकीवरील ताबा सुटला व दुचाकीने आईसोबत चालणाऱ्या नागाप्पाला धडक दिली. या धडकेने नागाप्पा हा २० फूट रस्त्याबाहेर फेकला गेला. त्याचा जागीच मृत्यू झाला. सुदैवाने त्याच्या आईला कोणत्याही प्रकारे दुखापत झाली नाही. नागाप्पाला धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार तेथून पळ काढत असताना चिरेखाणीवर काम करणाऱ्या इतर कामगारांनी आरडाओरडा केला. त्यामुळे तो थांबला. या बालकाला त्याच्या नातेवाईकांसह प्रथम धारतळे येथील रुग्णालयामध्ये नेण्यात आले. तेथून अधिक उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नागाप्पाला तपासले असता तो मृत असल्याचे सांगितले. या घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आली. या माहितीनुसार पोलिसांनी दुचाकीचालकावर गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)