शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दापोली नगरपंचायतीचा डंपिंग गाऊंड प्रश्न निकाली

By admin | Updated: December 13, 2015 01:13 IST

प्रतीक्षा संपली : शहराचा कचरा जाणार आता हक्काच्या जागेत

शिवाजी गोरे ल्ल दापोली दापोली शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यासाठी नगरपंचायतीला गेली १५ वर्षे जागेची प्रतीक्षा होती. शहरातून कचऱ्याला होणारा वाढता विरोध पाहता कचऱ्याचे करायचे काय ही डोकेदुखी नगरपंचायतीची होती. भाडेतत्वावर घेतलेल्या चिरेखाणीत कचऱ्याचे डंपिंग केले जात होते. परंतु, त्या भागातील वाढता विरोध पाहता दिवसाला १० टन निघणाऱ्या कचऱ्याचे करायचे काय हा प्रश्न नगरपंचायतीपुढे होता. मात्र, आता नगरपंचायतीचा कचरा हक्काच्या जागेत जाणार असून, त्यासाठी ६ एकर जागा नगरपंचायतीने खरेदी केली आहे. दापोली नगरपंचायतीच्या स्थापनेपासून शहरातील कचरा समस्या ही डोकेदुखी बनली होती. अनेकवेळा याच कचऱ्याचे भांडवल करुन विरोधक सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडत होते. दरवर्षी लाखो रुपये भाडे देऊन नगरपंचायत खासगी जागेतील चिरेखाणीत कचरा टाकून तो जाळण्याचे काम करत होती. यावेळी चंद्रनगर, टाळसुरे, आपटी, बोरघर या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या खासगी जागेचा वापर करण्यात आला. परंतु, या सर्वच ठिकाणी नगरपंचायतीच्या कचऱ्याला त्या भागातील नागरिकांचा प्रखर विरोध झाला. आजूबाजूच्या गावातून विरोध झाल्याने नगरपंचायतीला आपल्या हद्दीतच कचरा डंपिंग करावा लागला. परंतु, या कचऱ्यामुळे शहरातील लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे भांडवल करुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच कोंडीत पकडले होते. त्यामुळे दापोली नगरपंचायत राजकारणात डंपिंग ग्राऊंड राजकारणाचा विषय बाजूला होता. डंपिंग ग्राऊंडचा मुद्दा पुढे करुन अनेक राजकीय पक्षांनी निवडणूक जाहीरनाम्यातही याला स्थान दिले होते. त्यामुळे गेली १५ वर्षाहून अधिककाळ सतत गाजत असणारा व विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी करण्याची संधी मिळणारा डंपिंग ग्राऊंडचा मुद्दा निकाली काढण्यात दापोली नगरपंचायतीला यश आले आहे. दापोली शहरापासून अवघ्या दोन कि. मी. अंतरावर ६ एकर जागा नगरपंचायतीला सरकारी दरात मिळाल्याने गेली १५ वर्षे भिजत पडलेल्या प्रश्नावर तोडगा निघाला आहे. दापोली नगरपंचायतीने यापूर्वीच ओला कचरा मार्गी लावणारा प्रकल्प सुरु केला आहे. आता शहरातील सुक्या कचऱ्याचा प्रश्नदेखील निकाली निघाला असून, सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारे युनिटसुद्धा बसवण्यात येणार आहे. शहराबाहेर असणाऱ्या या डंपिंग ग्राऊंडसमोर २० गुंठे जागा ग्रीन झोनसाठी आरक्षित ठेवण्यात आली असून, या २० गुंठे जागेत कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. डंपिंग ग्राऊंडसाठी पुरेशी जागा उपलब्ध झाल्याने दापोली शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सध्या तरी निकाली निघाला आहे.