आंजर्ले येथे पाईपलाईनचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST2021-07-02T04:21:58+5:302021-07-02T04:21:58+5:30

दापोली : तालुक्यातील आंजर्ले गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी खुटीचे पाणी ग्रॅव्हिटी नळपाणी योजना राबविण्यात आली आहे. या योजनेच्या ...

Damage to the pipeline at Anjarle | आंजर्ले येथे पाईपलाईनचे नुकसान

आंजर्ले येथे पाईपलाईनचे नुकसान

दापोली : तालुक्यातील आंजर्ले गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी खुटीचे पाणी ग्रॅव्हिटी नळपाणी योजना राबविण्यात आली आहे. या योजनेच्या काही पाईपचे अज्ञातांनी दगड मारून नुकसान केल्याचा तक्रार अर्ज दापोली पोलीस ठाण्यात आंजर्लेच्या सरपंच स्वप्नाली पालशेतकर यांनी दिला आहे.

आंजर्ले गावाला खुटीचे पाणी या ठिकाणावरून ग्रॅव्हिटी नळपाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतीद्वारे ४ इंच बाय ३ इंच असा जॉईंट मारण्यात आला होता़ पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. २३ जूनला रात्रीच्या सुमारास या पाईपलाईनवर अज्ञाताने दगड मारून जॉईंट काढून टाकण्यात आल्याची माहिती आंजर्ले येथील ग्रामस्थ ललित बापट यांनी उपसरपंच मंगेश महाडिक यांना दिली. त्यानंतर त्याजागी जाऊन झालेल्या प्रकारची पंचयादी करण्यात आली. त्यानंतर सरपंच स्वप्नाली पालशेतकर यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: Damage to the pipeline at Anjarle