शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

खाडीपट्ट्यात क्रशर सुरु

By admin | Updated: September 16, 2014 23:22 IST

उत्खनन बंदी : परवानगी नसतानाही कामे जोरात

खाडीपट्टा : खेड तालुक्यातील ग्रामीण भागात राजरोसपणे क्रशर सुरु असताना वाळू उपशावर बंदी का घातली गेली आहे, असा प्रश्न के. के. तांबे यांनी उपस्थित केला आहे. खाडीपट्ट्यातील विविध गावांत घरबांधणीसाठी जगबुडी व बारडोली खाडीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्या सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांवर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येते. मात्र, याच भागात चिरेखाणी व क्रशर अहोरात्र सुरु असून, त्याची वाहतूक खेड-पन्हाळजे मार्गावरुन राजरोसपणे चालू असते. त्याकडे महसूल विभाग दुर्लक्ष करीत आहे, असा प्रश्न तांबे यांनी केला आहे. आॅक्टोबर, नोव्हेंबर महिना नवीन बांधकामे सुरु करण्यासाठी उपयुक्त असतो. याच काळात घरांसह मोठ्या इमारतींचे बांधकाम सुरु होते. त्याचवेळी वाळूची आवश्यकता असते. खेड तालुक्यात वाळू उपशावर असलेल्या बंदीमुळे सर्वसामान्यांचे घर बांधण्याचे स्वप्न अपूर्ण राहाते. स्थानिक वाळूचा उपसा करायचा नाही, बाहेरील वाळू विकत घेणे परवडत नाही, अशा स्थितीत सर्वसामान्यांनी घरे बांधायची तरी कशी? असा प्रश्न तांबे यांनी केला आहे. सर्वसामान्य शेतकरी स्वत:च्या गरजेपुरतीच वाळू उपसतो, त्याची तो विक्री करीत नाही. तरीही गावातील तलाठी, मंडल अधिकारी वाळू उपशावर दंडात्मक कारवाई करतात. खाडीपट्ट्यात तीन क्रशर व अनेक चिरेखाणी राजरोसपणे सुरु आहेत. त्याला रॉयल्टी नाही. पूर्वी वाळू उपसा लिलावातून शासनाला रॉयल्टी स्वरुपात ठोस महसूल मिळत होता. मात्र, उपशावर बंदी असल्याने सध्या हाच महसूल बुडत आहे. सर्वसामान्यांचे बांधकामाचे स्वप्नही विरुन जात असल्याचे तांबे यांनी निदर्शनास आणून दिले. डबर, जांभा, खडी, सिमेंट, चिरे उपलब्ध आहे. मात्र, वाळू नसली तर बांधकामे कशी होणार, हा प्रश्न आहे. महसूल विभागाने याबाबत ठोस निर्णय घेऊन तालुक्यातील ग्रामीण भागात वाळू उपशाला परवानगी देऊन महसूल गोळा करावा, अशी मागणी तांबे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. तालुक्यात गौणखनिज उत्खननाला कोणतीही परवानगी दिलेली नाही, असे खेडचे तहसीलदार प्रकाश संकपाळ यांनी सांगितले. मात्र खेड तालुक्याच्या खाडीपट्टा भागात असे प्रकार घडत आहेत. (वार्ताहर)मनमानी दर आकारले जातात...आज बांधकामासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची किंमत वाढली आहे. यामुळे छोटे घर बांधायचे तरी बजेट लाखाच्या पुढे जाते. अशा स्थितीत मनमानी दर आकारत वाळू पुरवणाऱ्यांकडून सर्वसामान्यांना वाळू घेणे शक्य नाही. स्थानिक पातळीवर वाळू उपसा असेल तर प्रवास खर्च परवडतो. सर्वसामान्यांना योग्य दरात वाळू मिळू शकते. मात्र, यासाठी महसूल विभागाने सकारात्मक पावले उचलणे गरजेचे आहे. - के. के. तांबे, सामाजिक कार्यकर्ते व तंटामुक्त समिती सदस्य, खाडीपट्टा