शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूण आगारात परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:39 IST

चिपळूण : पाच दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर बहुसंख्येने तालुक्यात दाखल झालेले चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी निघाल्याने एसटीसह रेल्वे व खासगी वाहनांनाही ...

चिपळूण : पाच दिवसांच्या गणेश विसर्जनानंतर बहुसंख्येने तालुक्यात दाखल झालेले चाकरमानी परतीच्या प्रवासासाठी निघाल्याने एसटीसह रेल्वे व खासगी वाहनांनाही मोठी गर्दी होऊ लागली आहे. दोन दिवसांत तब्बल १२६ एसटी बस रवाना झाल्या असून, जादा गाड्याही हाऊसफुल्ल झाल्या आहेत. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आगार प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.

यावर्षी पूर परिस्थिती व अतिवृष्टीमुळे बहुतांशी चाकरमान्यांनी चिपळूणकडे पाठ फिरवली. तरीही सुमारे २० हजारहून अधिक चाकरमानी येथे दाखल झाले होते. या चाकरमान्यांसाठी १६० गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र आता परतीच्या प्रवासासाठीही तितक्याच गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पाच दिवसांच्या गणरायाचे मंगळवारी विसर्जन करण्यात आले. विसर्जनानंतर बहुसंख्येने दाखल झालेले चाकरमानी परतीचा प्रवासासाठी मुंबई, पुण्याला निघाल्याने त्यांच्या प्रवासासाठी चिपळूण आगाराने विशेष जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. मंगळवारपासून प्रारंभ झालेल्या परतीच्या प्रवासासाठी आगाराने ३४ एसटी बसगाड्या मुंबई मार्गावर रवाना झाल्या आहेत. बुधवारी प्रवाशांची संख्या वाढल्याने यावेळी बसस्थानक पूर्णतः हाऊसफुल्ल झाले होते.

येथील आगारात सकाळपासूनच चाकरमान्यांची गर्दी झाल्याने मुंबईसह पुणे मार्गावरील बसगाड्या हाऊसफुल्ल होऊन जात होत्या. परतीच्या प्रवासादरम्यान चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी आगारात स्वतंत्र जादा वाहतूक केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. आगाऊ बुकिंग करण्यासाठी आरक्षण केंद्रासमोर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. एकीकडे चाकरमान्यांसाठी जादा बसगाड्याचे नियोजन आगार प्रशासनाकडून करण्यात आले असले, तरी दुसरीकडे मात्र स्थानिक ग्रामीण फेऱ्याचे वेळापत्रक कोलडमडले होते. मंगळवारी आगारातून चाकरमान्यांसाठी ३४ तर बुधबारी ९२ जादा बसगाड्या सोडण्यात आल्या. चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासासाठी एसटीचालक वाहकांना आगार प्रशासनाकडून विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.