शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : रत्नागिरीतील कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली २९७वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 13:36 IST

मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी सोमवारी रात्री १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २९७ इतका झाला आहे. तर संगमेश्वरातील एका वृद्धेचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १० झाली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ११६ झाली आहे़

ठळक मुद्देरत्नागिरीतील कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली २९७वरजिल्ह्यात कोरोनामुळे १० जणांचे बळी, उपचार घेऊन ११६ रूग्ण झाले बरे

रत्नागिरी : मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी सोमवारी रात्री १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २९७ इतका झाला आहे. तर संगमेश्वरातील एका वृद्धेचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १० झाली आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ११६ झाली आहे़मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले असून, टप्प्याटप्प्याने तपासणी अहवाल प्राप्त होत आहेत.

सोमवारी सकाळी ४२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालांमध्ये रत्नागिरी ७, खेडमधील कळंबणी रुग्णालयातील ८, गुहागरातील १ आणि राजापुरातील २ अहवालांचा समावेश आहे. रत्नागिरीतील ७ रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत.त्यानंतर सोमवारी रात्री आणखीन १० अहवाल प्राप्त झाले. हे सर्व अहवाल संगमेश्वर तालुक्यातील असून, सर्व अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, यातील एका वृद्ध महिलेचा अहवाल येण्यापूर्वी मृत्यू झाला आहे. तालुक्यातील कोसुंब येथे नातेवाईकांकडे आलेल्या वृद्धेचा स्वॅब घेऊन तिला होम क्वारंटाईन करण्यात आले होते.

ही महिला घराजवळ पडल्याने तिला मार बसला होता. त्यातच तिचा मृत्यू झाला. तिच्यावर शासकीय निर्देशानुसार अंत्यसंस्कारही करण्यात आले होते. सोमवारी त्या महिलेच्या स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्यात कोरोनामुळे दुसरा बळी गेला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी