शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

रत्नागिरी : काँग्रेसचा हात पुन्हा बळकट करायचा आहे : रमेश कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 13:49 IST

राज्य पातळीवर आघाडी करण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र जिल्हास्तरावर निर्णय घेण्यास आम्ही समर्थ आहोत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत. पक्षाचे चिन्ह पुन्हा घराघरात पोहचवून काँग्रेसचा हात बळकट करायचा आहे असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनी तालुका काँग्रेस मेळाव्यात व्यक्त केले.

ठळक मुद्देकाँग्रेसचा हात पुन्हा बळकट करायचा आहे : रमेश कदमचिपळूण शहरात काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

चिपळूण : राज्य पातळीवर आघाडी करण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र जिल्हास्तरावर निर्णय घेण्यास आम्ही समर्थ आहोत. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवायच्या आहेत. पक्षाचे चिन्ह पुन्हा घराघरात पोहचवून काँग्रेसचा हात बळकट करायचा आहे असे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांनी तालुका काँग्रेस मेळाव्यात व्यक्त केले.शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघात सोमवारी तालुका काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष रतन पवार, काँग्रेसचे प्रदेश सचिव इब्राहिम दलवाई, माजी तालुकाध्यक्ष भरत लब्धे, महिला तालुकाध्यक्षा गौरी रेळेकर, माजी नगराध्यक्षा सावित्री होमकळस, डॉ.विजय रिळकर, डॉ.दिपक विखारे, हिंदुराव पवार, वासु मेस्त्री, अल्पसंख्यांक अध्यक्ष बशीर फकीर, श्रीकृष्ण खेडेकर, सुरेश कातकर, सुरेश राऊत, नंदू थरवळ, माजी नगराध्यक्ष अजमल पटेल, स्नेहा सुर्वे, अ‍ॅड.जीवन रेळेकर, शांताराम बुरटे, माजी नगरसेविका आदिती देशपांडे, माजी नगरसेवक रमेश खळे, युवती तालुकाध्यक्ष मुस्कान अडरेकर, युवक तालुकाध्यक्ष महेश कदम आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.यानिमित्ताने कामथे येथील अजित कासार, ग्रामपंचायत सदस्या अक्षता कासार, प्रशांत हरेकर, सचिन कासार आदींसह खेड येथील कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर तालुक्यातील काही शाळांना शालेय पुस्तकांचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष कदम म्हणाले की, आपली ताकद दाखविल्याशिवाय गणती होणार नाही. जिल्ह्यात संयुक्त निवडणुका लढल्याने पक्ष तळागाळात पोहचला नाही. म्हणून आता अडचणी वाढल्या आहेत. यापुढे तालुक्यात संयुक्त दौरा करुन बैठका घेवून बारकाईने लक्ष दिले जाईल.

विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षाच्या उमेदवाराने आमच्या कार्यकर्त्यासमोर बसावे. किती निधी देणार ते जाहीर करावेत. तरच आम्ही त्यांचे काम करु. त्याशिवाय आपली दखल घेतली जाणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत पक्षाचा झेंडा फडकवण्यासाठी आपणास स्वबळावर निवडणुका लढाव्या लागतील. तरच तळागाळात पक्ष पोहोचण्यास मदत होईल असे सांगितले.

यावेळी तालुकाध्यक्ष प्रशांत यादव म्हणाले की, विरोधी पक्षाच्या तुलनेत आपण खूपच मागे आहोत. याचा विचार करावा लागेल. मागचे दिवस फार उगाळून चालणार नाही. तालुक्यात आपली यंत्रणा घट्ट नाही. ती उभारावी लागणार आहे. सर्वसामान्याच्या प्रश्नावर आवाज उठवला तरच पक्ष मोठा होईल.

पक्षासाठी काम करणारा कार्यकर्ता हवा आहे. कार्यकर्त्यांच्या योगदानाशिवाय पक्ष मोठा होणार नाही. जुना व नवीन भेदभाव होणार नाही. सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले. यावेळी तालुक्यातील विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्याचे सूत्रसंचालन मुराद अडरेकर यांनी केले.

टॅग्स :congressकाँग्रेसRatnagiriरत्नागिरीPoliticsराजकारण