शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, शहर आघाडीचा बहिष्कार

By admin | Updated: July 30, 2014 23:47 IST

चिपळूण पालिका : स्वीकृत नगरसेवक वादामुळे काँग्रेस आघाडीत फूट

चिपळूण : येथील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून काँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली असून, आज (बुधवारी) झालेल्या या निवडीच्या सभेवर काँग्रेससह शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकला. स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादीच्या इनायत मुकादम यांची निवड करण्यात आली आहे. स्वीकृत नगरसेवकपदाचा वाद शिगेला पोहोचला असून, आघाडीत बिघाडी झाली आहे.चिपळुणात आघाडीतील वातावरण चांगलेच तापले आहे. आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली असून ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पालिकेतील या वादाचा फटका आघाडीला बसण्याची शक्यता आहे. चिपळूण पालिकेच्या स्वीकृत नगरसेवक निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी नीता शिंदे उपस्थित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते राजेश कदम यांनी स्वीकृत नगरसेवकपदासाठी इनायत मुकादम यांचा एकमेव अर्ज आल्याचे जाहीर केले. मुकादम यांची स्वीकृतपदी निवड झाल्याचे शिंदे यांनी त्यानंतर सांगितले. स्वीकृत नगरसेवक पदासाठी ९ जण इच्छुक होते. पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीत इनायत मुकादम यांना ६ महिन्यासाठी हे पद देण्याचे ठरविण्यात आले. मात्र, हा निर्णय काँग्रेस नगरसेवकांना मान्य न झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला यापुढे पाठिंबा द्यायचा नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच या निवडीप्रसंगी काँग्रेसचे नगरसेवक व उपनगराध्यक्ष लियाकत शाह, पाणी पुरवठा समितीचे सभापती कबीर काद्री, संजय रेडीज यांच्यासह शहर विकास आघाडीचे नगरसेवक मोहन मिरगल, समीर जाधव, मिलिंद कापडी, पूजा गांगण, सायली काते हे नगरसेवक अनुपस्थित होते. काँग्रेसचे नगरसेवक संजय रेडीज हे सभागृहाबाहेर होते. मात्र, ते सभागृहात आले नाहीत. काँग्रेस आणि शहर विकास आघाडीच्या या निवडणुकीतल बहिष्काराने पुन्हा एकदा चिपळूण पालिकेतील आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. (वार्ताहर)