शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

९५ टक्के शिधापत्रिका संगणकीकृत

By admin | Updated: July 1, 2015 00:36 IST

काळाबाजार रोखण्यास मदत होणार : २ लाख २0 हजार ८२५ शिधापत्रिका धारकांचा समावेश--लोकमत विशेष

गिरीश परब -सिंधुदुर्गनगरी -रेशनवरील अन्नधान्य, रॉकेल याचा काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने राज्यातील सर्व शिधापत्रिका संगणीकृत करण्याचे ठरविले. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिधापत्रिका संगणीकरण करण्याचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असून तब्बल २ लाख २० हजार ८२५ शिधापत्रिका संगणकीकृत झाल्या आहेत.गोरगरीब जनतेच्या सोयीसाठी सरकारने रास्त दरात अन्नधान्य, रॉकेल, गॅस देण्याची व्यवस्था केली आहे. तिचा फायदा सधन मंडळी मोठ्या प्रमाणात घेत आहेत. अशा लोकांचा बंदोबस्त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी रेशनवर अन्नधान्य, रॉकेल यांचा काळाबाजार होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. पात्र व्यक्तींना पुरेसे धान्य मिळत नाही. हा भ्रष्टाचार रोखण्यासाठी सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण करण्याचे काम गेली २ वर्षे सुरु आहे. जिल्ह्यात २ लाख ३२ हजार ६९२ विविध प्रकारातील शिधापत्रिका आहेत. त्यापैकी २ लाख २० हजार ८२५ शिधापत्रिका या संगणीकृत झाल्या आहेत. तर उर्वरित ११ हजार ८६७ शिधापत्रिका बाकी असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.आॅनलाईनला किती कालावधी जाणारशिधापत्रिकांचे संगणकीकरणाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे त्याचबरोबर आधारकार्ड लिंकिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर शिधापत्रिका या आॅनलाईन होणार आहेत. या प्रक्रियेस सुमारे सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील संगणकीकृत झालेले शिधापत्रिकाधारकतालुकाएकूण शिधापत्रिकासंगणकीकृत झालेल्या शिधापत्रिकावैभववाडी१३०६९१३०६९देवगड३०४७७२८९११कणकवली३८२५४३७८०८मालवण३३६६९३०५९१कुडाळ४१२९५३६२९५सावंतवाडी४०२२४३८७०२वेंगुर्ला२३४८९२३४८९दोडामार्ग१२२१५११९६०एकूण२३२६९२२२०८२५