शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी यांनी कोरोना रुग्णांची केली विचारपूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 18:40 IST

CoronaVirus Ratnagiri : तुम्हाला योग्य उपचार मिळतात का? तुमच्याकडे लक्ष दिले जात का? तुम्हाला मिळणारे जेवण चांगले आहे ना? अशा शब्दात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कोविड सेंटरमधील रुग्णांशी संवाद साधला. त्यांची विचारपूस केली.

ठळक मुद्दे जिल्हाधिकारी यांनी कोरोना रुग्णांची केली विचारपूसयोग्य उपचार, जेवण मिळत आहे ना?

रत्नागिरी : तुम्हाला योग्य उपचार मिळतात का? तुमच्याकडे लक्ष दिले जात का? तुम्हाला मिळणारे जेवण चांगले आहे ना? अशा शब्दात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कोविड सेंटरमधील रुग्णांशी संवाद साधला. त्यांची विचारपूस केली.शहरानजीकच्या कुवारबाव येथील सामाजिक न्याय भवनमधील कोरोना केअर सेंटर, रा. भा. शिर्के प्रशाला येथील स्क्रिनिंग सेंटर, माळनाका व रेल्वे स्टेशन येथील तपासणी पथकाला गुरुवारी भेट दिली. सामाजिक न्याय भवनमधील रुग्णांशी थेट संपर्क साधून मिळणारे औषधोपचार व जेवण याविषयी संवाद साधला.यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड याही उपस्थित होत्या. कोविड केअर सेंटरमध्ये देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, पुरेसा औषध साठा व शासनाच्या मार्गदर्शक प्रोटोकॉलनुसार देण्यात येणारे उपचार याविषयी डॉक्टर व स्टाफशी चर्चा करून मार्गदर्शन केले. तेथील डॉक्टर, स्टाफ नर्स व वॉर्डबॉय यांच्या कामांबाबत जिल्हाधिकारी मिश्रा यांनी समाधान व्यक्त केले. डॉक्टर व स्टाफ नर्स खूप चांगले काम करत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जाखड यांनी सांगितले.त्याचप्रमाणे या दोन्ही अधिकाऱ्यांनी रा. भा. शिर्के प्रशालेतील स्क्रिनिंग सेंटर व रेल्वे स्टेशन येथील तपासणी पथकाला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील कार्यरत असलेल्या कोविड योद्ध्यांना मी जबाबदार कोरोना योद्धा असे स्लोगनवाल्या टी-शर्टचे वाटप केले.सामाजिक न्याय भवनात एकूण ६९ सक्रिय रुग्ण आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये योगाचे क्लासेस सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सांगितले. यावेळी शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र गावडे उपस्थित होते.सक्रिय अधिकारीजिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड हे दोन्ही प्रमुख अधिकारी सातत्याने कार्यरत आहेत. कोविड सेंटर्समधील वाढीव सुविधांबाबत आवश्यक ती दक्षताही घेतली जात आहे. त्यामुळे कोरोना योद्धा म्हणून काम करणाऱ्यांना चांगले पाठबळ मिळत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीRatnagiriरत्नागिरी