शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य वनसंरक्षकांकडून किनाऱ्याची पाहणी

By admin | Updated: August 20, 2015 22:04 IST

दिसतं तसं नसतं... : हाकेच्या अंतरावर वृक्षावर कुऱ्हाड

शृृंगारतळी : दापोली व गुहागर तालुक्यातील समुद्रकिनारी असणाऱ्या जंगलाची अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. एस. एच. पाटील (नागपूर) व विभागीय वन अधिकारी नियोजन एम. एस. भोसले (कोल्हापूर) यांनी नागपंचमीच्या दिवशी किनारी असणाऱ्या नाना-नानी पार्क, सुरूबन, नक्षत्रबनाची पाहणी केली व समाधन व्यक्त केले.नागपंचमीच्या दिवशी बुधवारी नागपूर व कोल्हापूर येथील वन विभागाचे अधिकारी व त्यांच्या सोबत असणाऱ्या वर्दीतील फौजफाट्याने दापोलीपासून गुहागर किनारपट्टीच्या कडेने असणाऱ्या वनाची पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे. गेल्या दहा वर्षांपासून गुहागरसह संबंध रत्नागिरी जिल्ह्यात ज्या प्रमाणात वृक्षतोडीचा वेग आहे, त्या प्रमाणात वृक्षलागवड होताना दिसत नाही. वृक्ष लागवडीचा सोपस्कार मात्र धुमधडाक्यात पार पाडला जातो. नागपंचमीच्या दिवशी आलेल्या या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी समुद्राच्या कडेने नारळपाणी पित फिरण्यापेक्षा ज्या ठिकाणी जंगलतोड झाली आहे, त्याची पाहणी करण्याची गरज होती, असे म्हटले जात आहे.गुहागरच्या ग्रामीण भागासह आबलोली, भातगाव-रत्नागिरी रोड याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत आहे. मात्र, याकडे डोळेझाक केली जात आहे. घाटमाथ्यावर अनेक दिवसापासून पाऊस नाही. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती आहे.़ दुष्काळसदृश भागातील अधिकाऱ्यांना रखरखते ऊन व ओसाड प्रदेश कायम नजरेसमोर पाहण्याची सवय असल्याने अचानक डोळ्यासमोर किनारपट्टीचे हिरवेगार सौंदर्य दिसल्याने समाधान व्यक्त केले. रत्नागिरी जिल्ह्यातील वन अधिकाऱ्यांना वरिष्ठांना कुठे आणि कसे फिरवायचे, याची चांगली कला अवगत असल्याची कोपरखळी एका नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. (वार्ताहर)