शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कामथे उपजिल्हा रुग्णालयात साफसफाई मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:32 IST

चिपळूण : कोरोना रुग्णांसाठी आधार ठरलेल्या येथील कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला होता. बुधवारी सकाळपासून ...

चिपळूण : कोरोना रुग्णांसाठी आधार ठरलेल्या येथील कामथे उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला होता. बुधवारी सकाळपासून येथे नगरपरिषद कामगारांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत काही नागरिकांनीही सहभाग घेतला.

सध्या कोरोनाच्या परिस्थितीत कोविड केअर सेंटर म्हणून कामथे उपजिल्हा रुग्णालय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या रुग्णालयात एकूण १३२ बेड आहेत. यात ६५ ऑक्सिजन बेड तर ४ व्हेंटिलेटर बेड आहेत. या रुग्णालयात रुग्णांची संख्याही तितकीच आहे. चिपळूण तालुक्यासह उत्तर रत्नागिरीतील अनेक रुग्ण या रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेले काही दिवस हे रुग्णालय हाऊसफुल्ल असून, एकही बेड रिकामा नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे या रुग्णालयात ये-जा करणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रमाणही तितकेच आहे.

त्यातून पाण्याच्या बाटल्या, खाद्य पदार्थाचे पॅकेट्स, कागद व अन्य वस्तूंमुळे येथे कचऱ्याची समस्या गंभीर बनली होती. सफाई कामगार वर्ग अपुरा असल्याने रुग्णालय वगळता परिसराची साफसफाई व्यवस्थित होत नव्हती. त्यामुळे रुग्णालयाच्या परिसरात जागोजागी कचरा साचला होता.

याविषयी सामाजिक कार्यकर्ते तानू आंबेकर यांनी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय सानप यांच्याशी संपर्क साधून साफ-सफाईची मागणी केली होती. तसेच या कामासाठी सफाई कामगार पुरवण्याविषयी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. वैभव विधाते यांना विनंती केली होती. त्याशिवाय आंबेकर यांनी या स्वच्छता मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आरोग्य समिती सभापती शशिकांत मोदी यांनीही याप्रश्‍नी लक्ष घातले आणि सफाई कामगारांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली. नगरपरिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच सफाई कामगार शहराबाहेर कामासाठी पाठविण्यात आले होते.