चिपळूण- पिंपळी येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:33 IST2021-04-04T04:33:08+5:302021-04-04T04:33:08+5:30

चिपळूण : तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात अज्ञातावर ...

Chiplun- Abduction of a minor boy from Pimpali | चिपळूण- पिंपळी येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण

चिपळूण- पिंपळी येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण

चिपळूण : तालुक्यातील पिंपळी खुर्द येथील एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी तातडीने याबाबतचा तपास सुरू केला आहे.

दिनेश जितेंद्र चव्हाण (१६) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे.

दिनेश चव्हाण यांचा भाऊ रोहित जितेंद्र चव्हाण याने चिपळूण पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित आणि दिनेश हे दोन्ही भाऊ पिंपळी खुर्द येथे राहतात. गुरुवारी रोहित हा कामानिमित्त बाहेर गेला होता, तर दिनेश हा एकटाच घरात होता. दुपारी ४.३० वाजता रोहित घरी आला असता घराला बाहेरून कडी असल्याचे दिसले. तसेच त्याची दुचाकीही जागेवर नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दुचाकी घेऊन दिनेश बाहेर गेला असावा, असा अंदाज बांधत रोहितने त्याच्या मोबाइलवर संपर्क साधला; परंतु प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर रोहितने मित्रांना बोलावून शोधाशोध सुरू केली असता पिंपळी कॅनॉल येथे कालकाई मंदिराजवळ त्याची दुचाकी उभी दिसली. तसेच दुचाकीला बॅग आणि त्यामध्ये कपडे चप्पल आणि मोबाइलही लावलेले हाेते. त्यामुळे दिनेशला कोणी तरी फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद रोहित जितेंद्र चव्हाण याने चिपळूण पोलीस ठाण्यात दिली आहे.

Web Title: Chiplun- Abduction of a minor boy from Pimpali