प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पावसकर बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:35 IST2021-08-20T04:35:54+5:302021-08-20T04:35:54+5:30

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पावसकर यांची बिनविरोध निवड करण्यात ...

Chandrakant Pawaskar unopposed as President of Primary Teachers Credit Union | प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पावसकर बिनविरोध

प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षपदी चंद्रकांत पावसकर बिनविरोध

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या अध्यक्षपदी पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पावसकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

चार वर्षांपूर्वी झालेल्या शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत महायुतीच्या पॅनलमधून चंद्रकांत पावसकर हे संचालक म्हणून निवडून आले होते. त्यांची शिक्षक पतपेढीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पावसकर यांच्या निवडीबद्दल पदवीधर शिक्षक संघटना, पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती, प्राथमिक शिक्षक समिती, अखिल भारतीय शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, उर्दू शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक संघ आदी संघटनांच्या जिल्हा तसेच तालुका पदाधिकाऱ्यांनी, विविध सामाजिक संस्था, राजकीय नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

आपल्या निवडीबद्दल बोलताना अध्यक्ष पावसकर यांनी आपल्या कार्यकाळात संस्थेच्या तसेच सभासदांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.

Web Title: Chandrakant Pawaskar unopposed as President of Primary Teachers Credit Union