ठळक मुद्देकार कोसळून मेढेत अपघात, सहा जखमीकर्सच्या मदतीने जखमीं दरीतून सुखरूप बाहेर
दापोली : महाबळेश्वरनजीकच्या मेढा घाटात स्वीफ्ट डिझायर कार दरीत कोसळून अपघात झाला. अपघातात सहाजण जखमी झाले आहेत. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
दरम्यान मेढा घाटात सुमारे ३०० फूट खोल दरीत कार कोसळून अपघात झाला. महाबळेश्वर ट्रेकर्सच्या मदतीने या सर्व जखमींना दरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. सर्वांना यशवंत हॉस्पिटल, सातारा येथे दाखल करण्यात आले आहे. सर्वांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.