आरग उपसरपंचांचे पद रद्द करावे

By Admin | Updated: August 18, 2015 00:40 IST2015-08-18T00:35:59+5:302015-08-18T00:40:55+5:30

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : विविध संघटना रस्त्यावर

Cancellation of the post of Deputy Labor Commissioner | आरग उपसरपंचांचे पद रद्द करावे

आरग उपसरपंचांचे पद रद्द करावे

सांगली/मिरज : आरग (ता. मिरज) येथे महिला सरपंचास ध्वजारोहण करू न देणाऱ्या उपसरपंचांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी सांगली, मिरजेतील विविध संघटनांनी सोमवारी जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आरग येथे स्वातंत्र्यदिनी दलित महिला सरपंच विशाखा कांबळे यांना डावलून उपसरपंच अनिल कोरबू यांनी ध्वजारोहण केले. उपसरपंचांच्या या कृत्याबाबत संतप्त प्रतिक्रिया आहेत. मिरज तालुका मागासवर्गीय संघर्ष समितीचे माजी सभापती सदाशिव खाडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोद इनामदार, विश्वास खांडेकर, महादेव दबडे, सचिन कांबळे, मजनू कांबळे, नितीन कांबळे, अरुण कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आरगच्या उपसरपंचांचे पद रद्द करण्याची मागणी केली.
पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष जैलाब शेख, मोहसीन मणेर, शोएब सय्यद, मन्सूर नदाफ, प्रकाश कांबळे, युसूफ शेख, शाबुद्दीन शेख, नारायण बेळगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. या घटनेची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Cancellation of the post of Deputy Labor Commissioner