भीषण आगीत तीन टपऱ्या जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST2021-03-22T04:28:48+5:302021-03-22T04:28:48+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : शहरात शनिवारी ११ वाजण्याच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत भाजी व फळ विक्रेत्याच्या तीन ...

Burn three pots in a fierce fire | भीषण आगीत तीन टपऱ्या जळून खाक

भीषण आगीत तीन टपऱ्या जळून खाक

लाेकमत न्यूज नेटवर्क

दापोली : शहरात शनिवारी ११ वाजण्याच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत भाजी व फळ विक्रेत्याच्या तीन टपऱ्या जळून खाक झाल्या असून, हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दापोली शहरातील दाभोळ रोडवरील लागलेल्या आगीत फळ विक्रेते पलसू पवार यांचे १० हजार रुपये, भाजी विक्रेत्या रियाना काझी १५ हजार रुपये, रजिया शेख यांचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दाभोळ रोडवर सुमारे ४० ते ५० बेकायदेशीर टपऱ्या आहेत. त्यातील ३ टपऱ्यांना रात्री अचानक आग लागली. या अगीत तीन दुकाने जळून खाक झाली. मोठा भडका होण्याआधीच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आग कशी लागली कळू शकलेले नाही.

आग लागलेल्या टपऱ्या शेजारीच एक छोटे हॉटेल व बाजूलाच न्यायाधीश निवासस्थान आहे तर समोरच्या बाजूला जनावरांचा दवाखाना आहे. या झोपड्यांना लागून ४० ते ५० झोपड्या आहेत. सुदैवाने आग आटोक्यात आली अन्यथा सर्व झोपड्या जळून बेचिराख झाल्या असत्या. मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला.

Web Title: Burn three pots in a fierce fire