रत्नागिरीत भर बाजारपेठेतील कपड्याच्या दुकानात चोरी, ३ लाखांचा मुद्देमाल लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 13:53 IST2022-05-16T13:53:24+5:302022-05-16T13:53:53+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील भर बाजारपेठेतील कपड्यांचे दुकान फोडून चोरट्याने रोख रक्कम आणि कपडे असा एकूण सुमारे ३ लाख ...

रत्नागिरीत भर बाजारपेठेतील कपड्याच्या दुकानात चोरी, ३ लाखांचा मुद्देमाल लंपास
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील भर बाजारपेठेतील कपड्यांचे दुकान फोडून चोरट्याने रोख रक्कम आणि कपडे असा एकूण सुमारे ३ लाख १९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही चोरी शनिवारी रात्री १० ते रविवारी सकाळी ९.३० वाजण्याचा दरम्यान घडली आहे.
याबाबत दुकान मालक कमलेश भवरलाल गुंदेचा (४१, रा. पऱ्याची आळी, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. त्यांचे रत्नागिरी शहरातील रामआळी येथे कॉर्नर स्टाईल नावाचे कपड्याचे दुकान आहे. चोरट्याने शनिवारी रात्री दुकानाच्या टेरेसवरील लोखंडी ग्रील कोणत्यातरी हत्याराने उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील रोख २५ हजार रुपये, चांदीची नाणी आणि नामांकित कंपन्याचे कपडे चोरून नेले. या चोरीचा अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.