खेडशी येथील बेपत्ता प्रौढाचा आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:28 IST2021-04-03T04:28:49+5:302021-04-03T04:28:49+5:30

रत्नागिरी : गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या खेडशी येथील प्रौढाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास खेडशी रेल्वे रुळावर आढळला. याची ...

The body of a missing adult was found at Khedshi | खेडशी येथील बेपत्ता प्रौढाचा आढळला मृतदेह

खेडशी येथील बेपत्ता प्रौढाचा आढळला मृतदेह

रत्नागिरी : गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या खेडशी येथील प्रौढाचा मृतदेह शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास खेडशी रेल्वे रुळावर आढळला. याची ग्रामीण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अरविंद सीताराम गवाणकर (५०, रा.खेडशी चिंचवाडी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे.

याबाबत प्रवीण सीताराम गवाणकर यांनी ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, गुरुवार १ एप्रिल राेजी सकाळी ५ वाजल्यापासून अरविंद गवाणकर घरात कोणालाही न सांगता निघून गेले होते. या प्रकरणी त्यांनी ग्रामीण पोलिसांकडे बेपत्‍ता असल्याबाबत माहिती दिली होती.

शुक्रवारी सकाळी अरविंद यांचा मृतदेह खेडशी रेल्वे रुळाजवळ आढळला. याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा करून उत्‍तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी अधिक तपास हेडकाॅन्स्टेबल संतोष कांबळे करत आहेत.

Web Title: The body of a missing adult was found at Khedshi