रत्नागिरीमध्ये अपघातात बुलेटस्वार ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 14:21 IST2019-03-20T14:21:19+5:302019-03-20T14:21:38+5:30
आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्यांच्या लक्षात आहे.

रत्नागिरीमध्ये अपघातात बुलेटस्वार ठार
रत्नागिरी : संगमेश्वर-देवरुख रस्त्यावरील कोसुंब येथे एमआयडीसी रोडवर झालेल्या दुचाकी अपघातात प्रेमनाथ पवार (५०) या ठेकेदाराचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे.
आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचे रस्त्यावरून जाणाऱ्यांच्या लक्षात आहे. यावेळी हे दोघेही रस्त्याच्या बाजुला निपचित पडलेले होते. यातील ठेकेदार पवार हे बुलेटवरून अन्य एकासोबत जात होते. यावेळी दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते रस्त्याशेजारील दुकानाच्या दगडांवर आदळले. यामध्ये पवार यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभार जखमी झाला आहे.