मोठी बातमी! खेड तालुक्यात दरड कोसळली; 17 जणांसह ढिगाऱ्याखाली गाडली गेली 25 जनावरं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2021 01:24 PM2021-07-23T13:24:23+5:302021-07-23T13:24:34+5:30

तब्बल 12 घरांना याचा फटका बसला आहे. यातील 6 घरे पूर्णपणे पडली आहेत. त्यात 17 जण गाडले गेलाची शक्यता आहे. याच बरोबर 25 जनावरेही दरडीखाली गाडली गेली आहेत.

Big news! Darad collapsed in Khed taluka; 17 people may have been buried under the mound | मोठी बातमी! खेड तालुक्यात दरड कोसळली; 17 जणांसह ढिगाऱ्याखाली गाडली गेली 25 जनावरं

मोठी बातमी! खेड तालुक्यात दरड कोसळली; 17 जणांसह ढिगाऱ्याखाली गाडली गेली 25 जनावरं

Next

खेड - रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे. यातच आज (शुक्रवार) यथील धामणंदनजीकच्या पोसरे बौद्धवाडीत शुक्रवारी दरड कोसळून 17 जण त्याखाली गाडले गेले असल्याचे धक्कादायक वृत्त आहे.

खेड तालुक्यात गेला आठवडाभरापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने बुधवारी रात्रीपासून जोर धरला आहे. या मुसळधार पावसामुळे पोसरे येथील बौद्धवाडीवर दरड कोसळली. तब्बल 12 घरांना याचा फटका बसला आहे. यातील 6 घरे पूर्णपणे पडली आहेत. त्यात 17 जण गाडले गेलाची शक्यता आहे. याच बरोबर 25 जनावरेही दरडीखाली गाडली गेली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Maharashtra Rain Live Updates : महाडच्या तळई गावात दरड कोसळून 22 जणांचा मृत्यू

खेड तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे गुरुवारी जगबुडी आणि नारिंगी नद्यांना पूर आला होता. यामुळे नदी काठच्या गावांत मोठ्या प्रमाणावर पाणी शिरले होते. एवढेच नाही, तर खेड बाजारपेठही पाण्याखाली गेली होती. सतस सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण तालुक्यातील जनजीवनही विस्कळीत झाले आहे.

रायगडमधील तळई गावात दरड कोसळली 32 जणांचा मृत्यू -
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळच्या सुमारास रायगडमधील तळई गावातही दरड कोसळली. यात गावातील सुमारे ३५ घरे गाडली आहेत. मुसळधार पावसामुळे या दुर्घटनास्थळावर मदत पोहोचवणे शक्य झाले नाही. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनीच मदतकार्य सुरू करून येथील गाडल्या गेलेल्या घरांमधून तब्बल 32 मृतदेह बाहेर काढले आहेत. तर अद्यापही 80 ते 90 मृतदेह ढिगाऱ्याखाली दबले गेले असल्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.  

Ratnagiri Flood: धडकी भरवणारा पाण्याचा वेढा; एअर फोर्सने आकाशातून काढलेले रत्नागिरी पुराचे फोटो

दरड कोसळून 4 लोकांचा मृत्यू -

पोलादपूर - साखर सुतार वाडी येथे दरड कोसळून 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच अजून 5 लोक ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. 4 लोक जखमी आहेत. या गावांना जोडणारे पितळवाडी- उमरठ फाटा पूल तसेच उमरठ फाटा ते साखर पूल देखील वाहून गेल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. 

Web Title: Big news! Darad collapsed in Khed taluka; 17 people may have been buried under the mound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app