संगमेश्वर बाजारपेठेत मोठी आग, लाखो रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 13:29 IST2024-06-15T13:29:17+5:302024-06-15T13:29:56+5:30

संगमेश्वर बाजारपेठ ही मोठी बाजारपेठ असून नेहमीच गजबजलेली असते. येथील दुकानेही एकमेकांना लागून आहेत.

Big fire in Sangameshwar market, loss of lakhs of rupees | संगमेश्वर बाजारपेठेत मोठी आग, लाखो रुपयांचे नुकसान

संगमेश्वर बाजारपेठेत मोठी आग, लाखो रुपयांचे नुकसान

देवरुख : संगमेश्वर बाजारपेठेत शनिवारी सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. या आगीत प्रशांत बेंडके यांचे किराणा दुकान आणि भावेश पटेल यांचे शक्ती ट्रेडर्स, अशी दोन दुकाने जळून खाक झाली आहेत. या दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, स्थानिकांनी आगीवर नियंत्रण मिविण्याचे प्रयत्न सुरू केले. यानंतर, आग लागल्याची माहिती मिळताच देवरुख नगरपंचायतीचा अग्निशमन बंबही घटनास्थळी दाखल झाला. यामुळे शेजारील दुकानांना आगीची झळ कमी पोहचली. मात्र, ही आग कशामुळे लागली? यासंदर्भात अद्याप कसलीही माहिती मिळू शकलेली नाही.

संगमेश्वर बाजारपेठ ही मोठी बाजारपेठ असून नेहमीच गजबजलेली असते. येथील दुकानेही एकमेकांना लागून आहेत.

Web Title: Big fire in Sangameshwar market, loss of lakhs of rupees