शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गुहागर एज्युकेशनच्या अध्यक्षपदी भोसले

By admin | Updated: December 29, 2014 00:00 IST

अत्यंत संतप्त वातावरणामध्ये या निवडणुकीला सुरुवात झाली.

असगोली : गुहागर एज्युकेशन सोसायटी, गुहागर या नोंदणीकृत संस्थेची ६७वी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेच्या सन २०१५-१६ ते सन २०१९-२०च्या कालावधीसाठी नियंत्रण मंडळाच्या निवडणुकीमध्ये संस्थेचे विद्यमान अध्यक्ष महेश भोसले, सचिवपदी उदय जोशी, तर खजिनदारपदी प्रसाद कचरेकर यांची एकतर्फे निवड झाली आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून अत्यंत संतप्त वातावरणामध्ये या निवडणुकीला सुरुवात झाली. या निवडणुकीला विरोधी अध्यक्षपदी असलेले उमेदवार पद्माकर आरेकर आणि त्यांच्या संपूर्ण पॅनेलने या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकल्याने ही निवडणूक अध्यक्ष महेश भोसले यांच्या पॅनेलच्या बाजूने झाली. या निवडणुकीमध्ये एकूण २३०० मतदारांपैकी ८४५ मतदारांनी आपला हक्क बजाविला. या निकालामध्ये अध्यक्ष महेश भोसले (८०६), पद्माकर आरेकर (२३), सचिव उदय जोशी (७७२), राजेंद्र आरेकर (३८), खजिनदार प्रसाद कचरेकर (७३६), मंदार आठवले (४९), मते मिळाली तर संचालक मंडळातील अनिल जोशी (७२०), ज्योती परचूरे (७११), दीपक कनगुटकर (७३२), प्रभाकर आरेकर (७२४), संदीप भोसले (७२५), महेश मोरे (७२३), मनिष खरे (७१२), राजेश गोयथळै (७०५), राकेश गोयथळे (७०२), स्नेहा परचुरे (७२४), सुरेश सावंत (७१४) अशी मते मिळाली आहेत. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून संदीप देवकर, मिलिंद सुर्वे यांनी काम पाहिले, तर अध्यक्ष महेश भोसले यांनी स्वत: निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. (वार्ताहर)