Ratnagiri: सायली बारमध्येच सापडला भक्ती मयेकर हिचा मोबाइल, गुन्ह्यातील अनेक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 15:45 IST2025-09-05T15:44:32+5:302025-09-05T15:45:15+5:30

याप्रकरणी दुर्वास पाटीलसह चौघांना पाेलिसांनी अटक केली आहे

Bhakti Mayekar mobile phone found in Sayali Bar many details of the crime are likely to be revealed | Ratnagiri: सायली बारमध्येच सापडला भक्ती मयेकर हिचा मोबाइल, गुन्ह्यातील अनेक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता 

Ratnagiri: सायली बारमध्येच सापडला भक्ती मयेकर हिचा मोबाइल, गुन्ह्यातील अनेक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता 

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद-खंडाळा येथील सायली देशी बारमधून गुरुवारी सकाळी भक्ती मयेकर हिचा माेबाइल हस्तगत करण्यात रत्नागिरी शहर पाेलिसांना यश आले. या मोबाईलच्या डाटामधून आणखी काही माहिती हाती लागते का, यासाठी प्रयत्न पाेलिस करत आहेत.

वाटद - खंडाळा येथे भक्ती मयेकर हिला सायली देशी बारमध्ये वायरने गळा आवळून मारल्याचे उघडकीस आल्यानंतर अन्य दाेन खुनांचा उलगडा झाला. त्याच ठिकाणी सीताराम वीर याला मारहाण केल्याचे पाेलिस तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी दुर्वास पाटीलसह चौघांना पाेलिसांनी अटक केली आहे. पाेलिसांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान बारमधूनच मयत भक्ती मयेकर हिचा मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे.

भक्ती मयेकरचा मोबाइल पोलिसांच्या हाती लागल्यामुळे या गुन्ह्यातील अनेक गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता आहे. मोबाइलमधील तिचे दुर्वाससोबत झालेले कॉल डिटेल्स, चॅटिंग तसेच सीताराम वीर तिच्याशी फोनवर अश्लील बोलत असल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिस भक्ती मयेकर हिच्या मोबाइलचे सीडीआर तपासणार आहेत. या तांत्रिक तपासातून या गुन्ह्यातील अनेक गोष्टींवर प्रकाश पडण्यास मदत होणार आहे.

Web Title: Bhakti Mayekar mobile phone found in Sayali Bar many details of the crime are likely to be revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.