शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

चिपळूणचे सांस्कृतिक वातावरण भावणारे

By admin | Updated: October 6, 2015 23:46 IST

विनायक राऊत : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरचा पुरस्कार वितरण सोहळा

चिपळूण : येथील सांस्कृतिक आणि साहित्यिक वातावरण मनाला अधिक भावणारे आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन चिपळूणकरांनी यशस्वी केले ही त्यांच्या कार्याची पावती आहे. महाराष्ट्र ही विरांची भूमी आहे. ज्ञानोबा, तुकोबांच्या भूमीने मराठी मनाला उभारी दिली आहे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले. चिपळुणातील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरचा पुरस्कार वितरण सोहळा ब्राह्यण सहाय्यक संघाच्या सभागृहात खासदार राऊत यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमाला आमदार सदानंद चव्हाण, ग्रंथालयाचे अध्यक्ष आप्पा जाधव, कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे, मधुसुदन केतकर आदींसह ग्रंथप्रेमी उपस्थित होते. या सोहळ्यात डॉ. क्षेमा थत्ते यांना यमुनाबाई मालशे पुरस्कार, सांगलीचे आप्पा गाडगीळ यांना द. पा. साने (वकील) ग्रंथमित्र पुरस्कार, डॉ. शीला रेडीज, मनोहर चितळे यांना डॉ. मो. गो. कानडे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. खासदार राऊत पुढे म्हणाले की, पीएच. डी.सुध्दा विकत घेणारी आणि विकणारी मंडळी अवतीभोवती वावरत असताना ‘लोटिस्मा’सारखी संस्था वाचकांना उत्तम ग्रंथांच्या माध्यमातून सुसंस्कृत करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी डॉ. थत्ते यांनी जुन्या आठवणी सांगून बदलते चिपळूण उपस्थितांसमोर उभे केले. उत्तम पुस्तके वाचण्यासाठी ‘लोटिस्मा’चा कसा उपयोग झाला याबद्दल शीला रेडीज यांनी तर गेली ८ वर्षांहून अधिक काळ ‘लोटिस्मा’शी संबंधित असलेले मनोहर चितळे यांनी वाचनालयाचा धार्मिक आणि वैचारिक ग्रंथसंग्रह अप्रतिम असल्याचे सांगितले. गाडगीळ यांनी सांगली येथे गणेश वाचनालय चालवताना केलेल्या समाजकार्याबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन अंजली बर्वे यांनी तर आभार मधुसुदन केतकर यांनी मानले. (वार्ताहर)अखिल भारतीय साहित्य संमेलन चिपळूणकरांनी यशस्वी केले.ज्ञानोबा, तुकोबांच्या भूमीने मराठी मनाला उभारी दिली.पीएच. डी. सुद्धा विकत घेणारी आणि विकणारी मंडळी.क्षेमा थत्ते यांना यमुनाबाई मालशे पुरस्कार.ग्रंथमित्र पुरस्कार, कानडे पुरस्काराचेही वितरण.