बँक व्यवस्थापक मारहाणप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:34 IST2021-09-26T04:34:37+5:302021-09-26T04:34:37+5:30

पाली : आपले कर्तव्य बजावत असताना रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापक संजय मनाेहर भालेकर (रा. रत्नागिरी) यांना मारहाण ...

Bank manager granted pre-arrest bail in assault case | बँक व्यवस्थापक मारहाणप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

बँक व्यवस्थापक मारहाणप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

पाली : आपले कर्तव्य बजावत असताना रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापक संजय मनाेहर भालेकर (रा. रत्नागिरी) यांना मारहाण झाल्याची घटना रत्नागिरी तालुक्यातील पाली येथे २० सप्टेंबर २०२१ राेजी घडली हाेती. या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पाेलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या संशयिताला जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक संजय मनोहर भालेकर आपले कर्तव्य बजावत हाेते. त्यावेळी पालीतील हाॅटेल लक्ष्मीसमोर सुरेंद्र शशिकांत सावंत (रा. नाणीज) यांनी विरोध करून संजय भालेकर यांना मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. या प्रकरणी सुरेंद्र सावंत याच्यावर रत्नागिरी ग्रामीण पाेलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम ३५३, ३३२, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सुरेंद्र सावंत याने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयात त्यांच्या वतीने ॲड. सुयोग नंदकुमार कांबळे यांनी युक्तिवाद मांडला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Web Title: Bank manager granted pre-arrest bail in assault case