शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न

By admin | Updated: July 29, 2014 22:58 IST

आर्थिक स्त्रोतासाठी धडपड : मऱ्हा जातीचे वळू अनुदानावर पुरवण्याची योजना

मेहरून नाकाडे - रत्नागिर, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत दुग्धोत्पादनात वाढ व्हावी, यासाठी विविध उपाययोजना राबवून आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहे. संकरित गार्इंचा पुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय मुऱ्हा जातीच्या म्हशींच्या पैदासीसाठी मुऱ्हा जातीचे वळू अनुदानावर पुरविण्यात येत आहेत. सुधारित जातीच्या दुधाळ जनावरांच्या पालनातून दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आर्थिक स्त्रोत निर्माण होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.विशेष घटक योजनेंतर्गत २ दुधाळ गाई व म्हशीचा गट ७५ टक्के अनुदानावर पुरविला जातो. अनुदानाची मर्यादा ६३७९६ इतकी आहे. अनुसूचित जातीच्या लाभधारकाकडील दुधाळ जनावरांना भाकड व गाभण काळात १०० टक्के अनुदानाने खाद्याचा पुरवठा विशेष घटक योजनेतून केला जातो. तरूणांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून रोजगार मिळण्यास मदत होत आहे.पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील कामधेनू दत्तक योजनेंतर्गत गावांची निवड करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने योजना राबविल्या जात आहेत. गावातील पशुधनाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी गावातील सर्व जनावरांना लसीकरण करणे, गाई, म्हशींना कृत्रिम रेतन दूध वाढविण्यासाठी क्षारमिश्रण व जीवनसत्व यांचा पुरवठा, प्रत्येक जनावरांना जंतनाशक औषध पाजणे, गोचीड निर्मुलन शिबिर, साथीचे रोग होऊ नयेत, यासाठी लसीकरण करणे, जनावरांच्या वाया जाणाऱ्या मलमुत्रापासून सेंद्रिय खत तयार करण्यात येत आहे. जिल्ह्यात संकरित १४ हजार ६२९ गाई असून, अन्य जातीच्या गाई ३ लाख ८७ हजार ५७१ इतक्या आहेत. एकूण गाई ४ लाख २२ हजार आहेत. तसेच म्हशींची संख्या ४५ हजार ७५ इतकी आहे. एकूण दुधाळ जनावरांची संख्या ४ लाख ४७ हजार २७५ इतकी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील दुग्ध उत्पादनात २.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कृत्रिम रेतनापासून उत्कृष्ट जातीच्या नर वासरांमध्ये वाढ झाली आहे. दत्तक गावामध्ये सांघिक भावना वाढीस लागली आहे. कुपोषित व कमी दूध देणाऱ्या जनावरांना कॅल्शियम व ‘अ’ जीवनसत्वयुक्त औषधांचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यातील पशुपालन मंडळातील ९००० कायमचे किंवा तात्पुरते वंध्यत्व असलेल्या गाई, म्हशींवर उपचार करण्यात आले आहेत. जननेंद्रियाच्या आजारांवरील औषधोपचारामुळे कृत्रिम रेतनामध्ये १५०० ने वाढ झाली आहे. तरीही हा दुग्धसाठा खूपच कमी आहे.