तुळसुंदे रस्त्याचे डांबरीकरण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:30 IST2021-05-14T04:30:57+5:302021-05-14T04:30:57+5:30

राजापूर : आमदार राजन साळवी यांच्या स्थानिक विकास फंडातून मंजूर झालेल्या तुळसुंदे मुख्य रस्ता उताराच्या डांबरीकरणाचा प्रारंभ शिवसेना उपजिल्हाप्रमुख ...

Asphalting of Tulsunde road started | तुळसुंदे रस्त्याचे डांबरीकरण सुरू

तुळसुंदे रस्त्याचे डांबरीकरण सुरू

राजापूर :

आमदार राजन साळवी यांच्या स्थानिक विकास फंडातून मंजूर झालेल्या तुळसुंदे मुख्य रस्ता उताराच्या डांबरीकरणाचा प्रारंभ शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजू साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला़. यावेळी शिवसेनेचे परशुराम डोर्लेकर उपस्थित हाेते.

गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या या नादुरूस्त रस्त्यासाठी डोर्लेकर यांच्यासह अन्य शिवसैनिक यांनी आमदार साळवी यांच्याकडे सातत्याने मागणी लावून धरली होती. त्याप्रमाणे आमदारांनी १० लाख रुपये निधीची तरतूद केल्याने ४९५ मीटर डांबरीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा प्रारंभ करण्यात आला आहे.

यावेळी जैतापूरचे माजी सरपंच गिरीश करगुटकर, सुनील किर, कुवेशीचे माजी सरपंच अनंत भोगले, सहदेव बावकर, माजी उपसरपंच विलास नारकर, बाळा बावकर, संजय आडिवरेकर, देविदास आडिवरेकर, शाखाप्रमुख निवास शिरगावकर, गजानन डोर्लेकर, मंगेश बावकर, दिनेश शिरगावकर, प्रकाश डोर्लेकर, कांता पावसकर, रविकांत आडिवरेकर, गुणाजी आडिवरेकर, सखाराम बावकर उपस्थित होते.

Web Title: Asphalting of Tulsunde road started