शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत आणखी १८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 13:08 IST

मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले असून, टप्प्याटप्प्याने तपासणी अहवाल प्राप्त होत आहेत.

ठळक मुद्दे कोरोनाबाधितांची संख्या २८७घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या १०० झाली आहेतसेच ३२ अहवाल निगेटिव्ह आले असून, दोन अहवालांचे निष्कर्ष आलेले नाहीत.

रत्नागिरी : मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी सोमवारी सकाळी ४२ अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालांमधील १८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २८७ इतका झाला आहे.मुंबईहून आलेल्या चाकरमान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे स्वॅब तपासणीसाठी मिरज येथे पाठविण्यात आले असून, टप्प्याटप्प्याने तपासणी अहवाल प्राप्त होत आहेत.

रविवारपर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २६९ इतकी होती. तर रत्नागिरी जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या अहवालांपैकी सोमवारी सकाळी ४२ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १८ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह अहवालांमध्ये रत्नागिरी ७, खेडमधील कळंबणी रुग्णालयातील ८, गुहागरातील १ आणि राजापुरातील २ अहवालांचा समावेश आहे. रत्नागिरीतील ७ रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. उर्वरीत सर्व रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.दरम्यान, रविवारी सायंकाळी उशिरा एका रुग्णाला उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे उपचार घेऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या १०० झाली आहे. तसेच ३२ अहवाल निगेटिव्ह आले असून, दोन अहवालांचे निष्कर्ष आलेले नाहीत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयRatnagiriरत्नागिरी