शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
3
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
4
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
5
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
6
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
7
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
8
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
9
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
10
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
11
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
12
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
13
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
14
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
15
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
16
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
17
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
18
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
19
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
20
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
Daily Top 2Weekly Top 5

पर्यायी उत्पन्नाचा विचार होणे आवश्यक

By admin | Updated: March 30, 2015 00:18 IST

तज्ज्ञांची उपस्थिती : गुहागरात आज हळद लागवड प्रशिक्षण

गुहागर : कोकणात आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या लाल मातीत हळदीचे पिक उत्तम प्रकारे येते हे येथील तरुण शेतकऱ्यांनी सिद्ध केले आहे. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना व्यावसायिक व तांत्रिकदृष्ट्या अधिक माहिती उपलब्ध व्हावी म्हणून गुहागर पंचायत समितीच्यावतीने सेस अनुदानांतर्गत ‘व्यावसायिक हळद लागवड कोकणातील शेतकऱ्यांना एक सुवर्णसंधी’ या विषयावरील प्रशिक्षण वर्ग सोमवार (आज) ३० मार्चला पंचायत समिती सभागृहामध्ये सकाळी १०.३० वा. आयोजित करण्यात आले आहे.
कोकणात विशेषत: रत्नागिरी जिल्ह्यात हळद लागवड शेतकरी आपल्या परसदारात करतात. विविध गुणकारी व औषधी गुणधर्म असलेली हळद जेवणापासून लग्न कार्यापर्यंत वापरली जाते. जिल्ह्यातील हळद व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास आर्थिक उत्पन्नात भरघोस वाढ होऊ शकते. या हेतूने या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले असल्याचे सभापती राजेश बेंडल व उपसभापती सुरेश सावंत यांनी सांगितले.या प्रशिक्षण वर्गामध्ये गेली दहा वर्षे हळद लागवडीमध्ये वेगवेगळे प्रयोग करुन उत्पादन क्षमता वाढविणारे प्रगतशील शेतकरी सचिन कारेकर हे अनुभवावर आधारीत व्यावसायिक हळद लागवड कशी करावी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. गुहागर तालुक्यातील हळद लागवड करणाऱ्या उपस्थित शेतकऱ्यांची मनोगते व गुहागर तालुका पंचायत समितीतर्फे नावीन्यपूर्ण योजनातून कशा प्रकारे सहकार्य केले जाणार असल्याबाबतची माहिती सभापती राजेश बेंडल, उपसभापती सुरेश सावंत व कृ षी अधिकारी देणार आहेत.
या प्रशिक्षण वर्गाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गटविकास अधिकारी बी. ई. साठे व सहाय्यक गटविकास अधिकारी दत्तात्रय आंबी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)