शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

सूचकांसाठी सर्वच पक्षांची कसरत

By admin | Updated: October 9, 2015 21:16 IST

मंडणगड : नगरपंचायतीच्या निवडणुकीचा ज्वर चढला; दोन दिवसांत उमेदवारांची गर्दी --रणसंग्राम

मंडणगड : तालुक्यातील पहिली नगरपंचायत निवडणूक प्रत्येक राजकीय पक्षाने प्रतिष्ठेची बनवली आहे. मंडणगड नगरपंचायत निवडणुकीची नामनिर्देशनपत्र गुरुवारअखेर दाखल करण्यात आली आहेत. आता शहरात निवडणूक प्रचाराचा ज्वर चढू लागला आहे. सेना, काँग्रेस महाआघाडी या दोन पक्षांनी सर्व १७ प्रभागात आपले उमेदवार उभे केले आहेत, तर भाजपने १५ प्रभागात उमेदवार उभे केले आहेत. मनसेने तीन प्रभागात उमेदवार उभे केले आहेत तर अपक्ष म्हणून सलाम मुकादम, सालेम सयद, हरेश मर्चंडे, रेश्मा हरेश मर्चंडे आणि संजय राणे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. अपक्षवगळता प्रत्येक राजकीय पक्षाला उमेदवार शोधणे कठीण झालेले असतानाच उमेदवारांना सूचक मिळवणे फार कठीण झाले होते. यासाठी सर्वच पक्षांची दमछाक झाली. मुळातच शहराची ३५९२ एवढी कमी लोेकसंख्या आहे. त्यात २३५१ एवढे मतदार आहेत. काही जागरूक नागरिकांनी आपले प्रत्येक पक्षाजवळ असणाारे संबंध शाबूत ठेवण्यासाठी अनेक महिन्यांची घरपट्टी, पाणीपट्टी (कर) भरले नाहीत. त्यामुळे सूचक म्हणून कोणी विचारण्यास आले तर थकीत असल्याचे कारण पुढे करत इतरांजवळ वाईटपणा घेण्याचे टाळले आहे. यामुळे अर्ज भरणाऱ्या उमेदवाराला सूचक मिळणे फार कठीण बनले होते. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवार मिळाले, पण सूचक मिळत नाहीत, अशी अनेक उमेदवारांची अवस्था झाली. तालुक्यातील पहिली नगरपंचायत निवडणूक आणि पहिल्यांदाच आॅनलाईन अर्ज भरण्याची पहिली वेळ असल्याने सर्वांनाच याची चिंता लागून राहिली होती. यामुळे नामनिर्देशनपत्र आॅनलाईन भरण्यासाठी सर्वच राजकारण्यांची धावपळ उडाली होती. १ तारखेला अर्ज विक्री सुरु झाली असली तरी आॅनलाईन अर्ज भरणे सक्तीचे असल्याने पाच तारखेपर्यंत अर्ज विक्रीची पाटी कोरी होती. संगणकावर अर्ज भरण्याचे प्रत्येकालाच कठीण बनले होते. त्यामुळे संगणकावर अर्ज भरण्याचे तंत्र आत्मसात केलेल्यांचा दर वधारला होता. सोमवारपर्यंत अर्ज भरण्यात आलेले नव्हते. सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी यांनी हाती लिहिलेले अर्ज आॅनलाईन स्वीकारण्याची परवानगी दिल्याने इच्छुकांची आॅनलाईनच्या संकटातून सुटका झाली. या निवडणुकीच्या अनुषंगाने जातपडताळणीची आॅनलाईन प्रमाणपत्र ही पाहण्याची संधी मिळाली. प्रमाणपत्रांचा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे सात व शेवटच्या ८ तारखेला अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती. आॅनलाईनचा व्याप व सूचकांच्या कमतरतेवर मात करत नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आली. (प्रतिनिधी)