शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: खेडमधील प्रमुख धरणे ओव्हरफ्लो, सांडव्यावरून विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 18:01 IST

नातूवाडी, शिरवली, पिंपळवाडी धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरू 

खेड : तालुक्यातील सर्वच प्रमुख धरणे शंभर टक्के भरली असून, धरण क्षेत्रामध्ये जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच सरासरी १५०० मिलिमीटर एवढी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खेड तालुक्यातील ज्या भागांना उन्हाळ्यात धरणाच्या पाण्याचा उपयोग होतो, त्या गावांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यंदा २० मेपासूनच पावसाने सुरुवात केल्याने जुलै महिन्याच्या पंधरवड्यात ओव्हर फ्लो होणारी धरणे जून महिन्याच्या अखेरीस पूर्ण क्षमतेने भरली आहेत.गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली असली, तरी नियमित पावसाची हजेरी लागत असल्यामुळे यावर्षी धरणात पुरेसा पाणी साठा होईल, अशी अशा आहे. तालुक्यातील नातूनगर भागात नातूवाडी व शिरवली धरण प्रकल्प आहे. शिव खाडीपट्टा भागात कोंडिवली धरण, पंधरागाव विभागात तळवट-शेलारवाडी गणवाल धरण, शेल्डी धरण, सातगाव खोपी विभागात शिरगाव पिंपळवाडी धरण प्रकल्प राज्य सरकारने पूर्णत्वास नेले आहेत. मात्र, नातूवाडी व शिरगाव धरण वगळता अन्य धरणातील पाण्यातून किती हेक्टर शेत जमीन ओलिताखाली येते हा संशोधनाचा भाग आहे. कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आलेल्या या धरणात पाणीसाठा दरवर्षी होत असतो, परंतु त्याचा योग्य पद्धतीने वापर होणे अपेक्षित आहे.तालुक्यातील नातूवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्प शिरवली लघु पाटबंधारे व पिंपळवाडी लघु पाटबंधारे तीनही प्रमुख धरणे शंभर टक्के भरली आहेत. शेलारवाडी मध्यम पाटबंधारे प्रकल्प ५१.३५ टक्के भरला असून, तळवट धरणामध्ये देखील ७२.३२ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र, नातूवाडी व शिरवली धरण सोडले, तर अन्य धरणातील पाण्याचा वापर शेतीसाठी अत्यल्प प्रमाणात वापर होताे. पिंपळवाडी धरणातील पाण्यावर खासगी वीज निर्मिती प्रकल्प आहे. मात्र, शेतीसाठी या पाण्याचा वापर करण्यासाठी शासनास्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे.

धरणाच्या सांडव्यावरून विसर्ग सुरूनातूवाडी धरणातून २४ जून रोजी दुपारी ३ वाजता, शिरवली धरणातून १५ जून रोजी पहाटे ५ वाजता, तर पिंपळवाडी धरणातून १७ जून रोजी सकाळी १० वाजता विसर्ग सुरू झाला.

खेड तालुक्यात २५ जूनपर्यंत धरणात झालेला पाणीसाठा (आकडे दशलक्षघन मीटरमध्ये)धरण - क्षमता - पाणीसाठा

  • तळवट धरण : ४.८५ : ४.६७
  • शेलारवाडी धरण : १०.१४ : ८.०४६
  • नातूवाडी धरण : १८.३७७ : १८.३७७
  • पिंपळवाडी धरण : १८.८९५ : १७.९४८
  • कोंडिवली धरण : २.९६१ : २.५५५
  • शिरवली धरण : २.९९७ : ३.३६५