शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

अजय देवगण याने केले रत्नागिरी पोलिसांचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 15:40 IST

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने पोलीस कल्याण निधीअंतर्गत पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी  तान्हाजी चित्रपट दाखवण्यात आला. या उपक्रमाची थेट दखल तान्हाजी चित्रपटातील अभिनेता अजय देवगण याने घेतली असून, या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल जिल्हा पोलिसांना धन्यवादही दिले आहेत.

ठळक मुद्देअजय देवगण याने केले रत्नागिरी पोलिसांचे कौतुककर्मचारी, अधिकारी, कुटुंबियांना दाखविला तान्हाजी चित्रपट

अरुण आडिवरेकर 

रत्नागिरी : सध्या सर्वत्र तान्हाजी चित्रपटाचा गवगवा सुरू आहे. या चित्रपटाची चलती सुरू असतानाच रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने पोलीस कल्याण निधीअंतर्गत पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी  तान्हाजी चित्रपट दाखवण्यात आला. या उपक्रमाची थेट दखल तान्हाजी चित्रपटातील अभिनेता अजय देवगण याने घेतली असून, या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल जिल्हा पोलिसांना धन्यवादही दिले आहेत.आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे असे म्हणत कोकणातील उमरठ (जि. रायगड) येथील तानाजी मालसुरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांना सुपूर्द केला. शिवछत्रपतींचे विश्वासू सहकारी तानाजी मालसुरे यांच्या पराक्रमाची यशोगाथा इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेलेली आहे. त्यांच्या बलिदानाचे आजही स्मरण केले जात आहे.

याच विषयावर अजय देवगणने तान्हाजी चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाने लहानांपासून थोरांपर्यंत साऱ्यांनाच भुरळ घातली आहे. चित्रपटाने सर्व रेकॉर्ड ब्रेक करून उच्चांक गाठला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांना या चित्रपटाने प्रभावीत केले. तानाजी मालसुरे यांच्या शौर्याचे दर्शन घडविणारा हा चित्रपट कर्मचारी, अधिकारी व त्यांच्या कुटुंबियांना दाखविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पोलीस कल्याण निधीअंतर्गत त्यांनी मंगळवारी सायंकाळी ३ ते ६ यावेळेत रत्नागिरीतील सिटी प्राईड राधाकृष्ण येथे सर्वांना चित्रपट दाखविला.त्यानंतर लगेचच जिल्हा पोलीस दलाच्या ट्विटर अकाऊंटवर चित्रपटाविषयी पोस्ट टाकण्यात आली. क्षणार्धात पोस्टला शंभरपेक्षा अधिक लाईक्सही मिळाल्या. एवढेच नव्हे तर ही पोस्ट चक्क तान्हाजी चित्रपटातील तानाजीची भूमिका साकारणाऱ्या अजय देवगणनेही पाहिली. त्याने या उपक्रमाबद्दल रत्नागिरी पोलिसांचे कौतुक केले.

एवढेच नव्हे तर त्याने आपण खूप आनंदी झाल्याचे आणि आपल्याला अभिमान वाटल्याचे त्यात नमूद करून रत्नागिरी पोलिसांचे आभार मानले आहेत. खुद्द ह्यतान्हाजीह्णनेच या उपक्रमाचे कौतुक केल्याने पोलिसांमध्ये याच विषयाची चर्चा केली जात आहे.योगायोग जुळून आलामराठा लाईफ इन्फ्रंटची ४ फेब्रुवारीला स्थापना करण्यात आली. त्यानिमित्ताने हा चित्रपट दाखविण्याचा योग साधण्यात आला. त्यातच तान्हाजी मालसुरे यांची मंगळवारी पुण्यतिथीही होती. जिल्हा पोलीस दलाने हा उपक्रम राबवून एक योगायोगही जुळवून आणला.

दैनंदिन कामाचा थकवा जाण्यासाठी, त्यांना पुन्हा ऊर्जा मिळण्यासाठी पोलीस कल्याण निधी अंतर्गत हा चित्रपट दाखविण्यात आला. कामाच्या गर्दीत पोलीस कमी प्रमाणात आपल्या कुटुुंबियांसमवेत असतात. यानिमित्ताने पोलिसांनाही काही काळ आपल्या कुटुुंबियांसमवेत घालविता आला.- विशाल गायकवाडअतिरिक्त पोलीस अधीक्षक

टॅग्स :Tanaji MovieतानाजीRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिस