शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘एपीएल’धारकांना धान्य सुरक्षाच नाही

By admin | Updated: August 26, 2015 00:23 IST

कोकण विभाग : शासनाचे १४ जिल्ह्यांना झुकते माप...

रत्नागिरी : ‘एपीएल’ शिधापत्रिकाधारकांना गेल्या नोव्हेंबरपासून रेशनदुकानावरील धान्यपुरवठा बंद झाला आहे. कमी पाऊस पडलेल्या १४ जिल्ह्यात एपीएल शिधापत्रिकाधारकांना अन्न सुरक्षा योजनेप्रमाणे तांदूळ प्रतिकिलो ३ रुपये आणि गहू प्रतिकिलो २ रुपये याप्रमाणे वितरण करण्यास सुरूवात केली आहे. परंतु कोकणातील एपीएलधारकांची धान्य सुरक्षा शासनाने काढून घेतली आहे.केंद्र सरकारची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना फेब्रुवारी २०१४ पासून सुरू झाली. या योजनेच्या प्राधान्य गट तसेच अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना धान्यपुरवठा नियमित सुरू आहे. मात्र, ‘एपीएल’धारकांना धान्य पुरवठा अनियमित केला गेला. नोव्हेंबर २०१४पासून तर धान्यपुरवठा पूर्णत: बंद करण्यात आला.जिल्ह्यात ९८,१९३ एपीएल शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांना प्रतिशिधापत्रिका धान्य देण्यात येते. जिल्ह्यासाठी एपीएलधारकांना ५६४ मेट्रिक टन गहू आणि ४६१ मेट्रिक टन तांदूळ इतके नियतन मंजूर आहे. १ फेब्रुवारीपासून अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. ही योजना सुरू झाल्यानंतर एपीएलधारकांंच्या धान्य नियतनात अनियमितपणा आला.नोव्हेंबरपासून या शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरवठाच बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या कार्डधारकांची आशा आता मावळलेलीच आहे. या कार्डधारकांना आता काळ्या बाजाराने धान्य खरेदी करावे लागते. त्यातच प्राधान्य गटासाठी उत्पन्नाच्या निकषावर यादी करताना अधिक उत्पन्न असलेल्यांनाही अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे.त्यातच आता शासनाने सुरूवातीच्या काळात पाऊस न झाल्याने काही जिल्ह्यांतील शेतकरी हवालदील झाले आहेत. त्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचे कारण सांगत यापैकी १४ जिल्ह्यातील ‘एपीएल’ शिधापत्रिकाधारकांनाही तांदूळ प्रतिकिलो ३ रुपये आणि गहू प्रतिकिलो २ रुपयाने देण्यास सुरूवात केली आहे. यात औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, परभणी, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे. मात्र, उर्वरित जिल्ह्यात एपीएलधारकांना ९ रुपये दराने तांदूळ आणि ८ रुपये दराने गहू मिळणेही दुरापास्त झाले आहे.कोकणातही गतवर्षीपासून पावसाच्या अनियमितपणामुळे शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनाही नुकसान सोसावे लागले आहे. शासनाने अन्न सुरक्षा योजनेमुळे नको, पण निदान नेहमीच्या दराने तरी आम्हाला धान्य द्यावे, अशी आर्त विनवणी एपीएलधारकांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)अन्नसुरक्षेचा तरी लाभ द्या...कोकणात पावसाचा अनियमितपणा सुरुच आहे. त्यामुळे यंदाही शेती धोक्यात आली आहे. मात्र, कोकणातील एपीएलधारकांसाठी रेशनवर धान्यच बंद झाल्याने सामान्य शेतकऱ्यांनी जगायचं कसं ? असा सवाल आता जिल्ह्यातून विचारला जात आहे.