Ratnagiri: रामपूर सरपंच निवडणुकीत एक मत फुटल्याने हमरातुमरी, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण निवळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:58 IST2025-06-14T16:56:40+5:302025-06-14T16:58:18+5:30

गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले

After the election for the post of Sarpanch of Rampur Gram Panchayat a dispute broke out between two groups due to a split vote | Ratnagiri: रामपूर सरपंच निवडणुकीत एक मत फुटल्याने हमरातुमरी, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण निवळले

Ratnagiri: रामपूर सरपंच निवडणुकीत एक मत फुटल्याने हमरातुमरी, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण निवळले

चिपळूण : रामपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीनंतर दोन गटात वादावादी झाली. या निवडणुकीत ५ विरुद्ध ४ असे मतदान होऊन सरपंचपदी अमिता अशोक चव्हाण यांची निवड झाली. गुप्त मतदान असताना विरोधी गटाचे एक मत फुटल्याचे लक्षात येताच हमरीतुमरी झाली व तणावपूर्ण वातावरण झाले. तेथे तैनात असलेल्या पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही.

तालुक्यातील रामपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी शुक्रवारी ग्रामपंचायतीत नायब तहसीलदार मोरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक लावण्यात आली होती. या ग्रामपंचायतीत एकूण ९ सदस्य आहेत. सरपंचपदाची निवडणूक तणावपूर्ण होणार असल्याचे संकेत मिळाल्याने पोलिस बंदोबस्त ठेवला होता. हे सरपंचपद खुले आहे.

दोन उमेदवारांनी सरपंचदासाठी अर्ज दाखल केल्याने गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. त्यात अमिता चव्हाण यांना ९ पैकी ५ मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. यानंतर त्याचठिकाणी ग्रामपंचायत सदस्यांमध्ये राडा झाला. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर वातावरण निवळले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत चिपळूण पोलिस स्थानकात कोणतीही नोंद झालेली नव्हती.

Web Title: After the election for the post of Sarpanch of Rampur Gram Panchayat a dispute broke out between two groups due to a split vote