दहावी निकालापूर्वी पाॅलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST2021-07-02T04:21:40+5:302021-07-02T04:21:40+5:30

रत्नागिरी : दहावीच्या निकालाची वाट न पाहता पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठीच्या प्रक्रियेचे ...

Admission process of Polytechnic will start before the 10th result | दहावी निकालापूर्वी पाॅलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार

दहावी निकालापूर्वी पाॅलिटेक्निकची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार

रत्नागिरी : दहावीच्या निकालाची वाट न पाहता पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. २०२१-२२ शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठीच्या प्रक्रियेचे नोटिफिकेशन दोन दिवसात जाहीर होतील, असे संकेत रविवारी तंत्र शिक्षण विभागाच्या झालेल्या बैठकीत देण्यात आले.

दहावीच्या निकालाला वेळ असल्याने विद्यार्थ्यांना अर्जात केवळ बैठक क्रमांक द्यायचा आहे. अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाची २०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठीची प्रवेशाची प्रक्रियेबाबत रविवारी तंत्र शिक्षण विभागाची ऑनलाईन बैठक झाली. संचालक, सहसंचालक, प्राचार्य, सुविधा केंद्राचे समन्वयक यांच्या उपस्थितीत झालेल्या बेठकीत प्रवेश प्रक्रियेबाबत चर्चा झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, दहावीची परीक्षा रद करत अंतर्गत मूल्यांकनावर विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला जाणार आहे.

निकालाची प्रक्रिया अद्याप अपूर्ण असल्याने त्यापूर्वीच पॉलिटेक्निक प्रवेशासाठी विद्यार्थ्याकडून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. दोन दिवसात अर्ज भरण्याबाबतची प्रक्रिया सुरू होण्याची शक्‍यता असून, नोटिफिकेशन येईल असे सूत्रांनी सांगितले. मागील वर्षी २९ जुलै रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला होता. तर, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया १० ऑगस्टला सुरू झाली होती. त्यामुळे प्रक्रियेला विलंब लागला. यंदा निकालाची वाट न पाहता नोटिफिकेशन काढून अर्ज भरण्याची प्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Admission process of Polytechnic will start before the 10th result