शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: July 12, 2014 00:33 IST

वेरळ घाटातील घटना : अज्ञान वाहनाची धडक

लांजा : मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ घाटात अज्ञात वाहनाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी राजाराम मनोहर मिरजकर (वय ६२) हे जागीच ठार झाले. दगडावर डोके आदळून रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. आज, शुक्रवारी सकाळी १० वा. हा अपघात घडला. मिरजकर रत्नागिरीतून लांजा येथे त्यांच्या घराची साफसफाई करण्यासाठी जात असताना ही दुर्घटना घडली. लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजाराम मनोहर मिरजकर हे मूळचे लांजा येथील रहिवासी आहेत. मुलीच्या शिक्षणासाठी गेल्या १५ वर्षांपासून ते रत्नागिरी येथे स्थायिक झाले होते. लांजा येथे शिक्षक व नंतर केंद्रप्रमुख ते शिक्षण विस्तार अधिकारी अशी पदे भूषविल्यानंतर ते ४ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले. मात्र, रत्नागिरीतून लांजा येथील घराकडे ते ये जा करीत असत.लांजा येथील घराची साफसफाई करण्यासाठी आज, शुक्रवारी सकाळी ९ वा. मुलीची प्लेझर (एमएच ०८ एक्स ३१४५) ही दुचाकी घेऊन ते रत्नागिरीहून निघाले होते. यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता. वेरळ घाट चढून पुढे जाताना मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोराची होती की, मिरजकर हे मोटारसायकलवरून गटारात फेकले गेले. या गटारातील दगडावर त्यांचे डोके जोरात आदळल्याने रक्तस्त्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांतील प्रवाशांनी लांजा पोलिसांना घटनेची खबर दिली. लांजा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मिरजकर यांना तेथून लांजा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, मिरजकर यांचे आधीच निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. राजाराम मिरजकर हे लांजातील एक आदर्श शिक्षक म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या अपघाती निधनाची माहिती मिळताच निवृत्त शिक्षक, शिक्षण क्षेत्रातील अनेक लोकांनी लांजा ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. या घटनेची लांजा पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)