Ratnagiri: पोहताना गंटागळ्या खाल्या, तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 15:58 IST2025-06-03T15:55:08+5:302025-06-03T15:58:42+5:30

मित्रांसोबत गेला होता पोहायला

A young man drowned in a lake while swimming in Ratnagiri | Ratnagiri: पोहताना गंटागळ्या खाल्या, तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

Ratnagiri: पोहताना गंटागळ्या खाल्या, तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

रत्नागिरी : तालुक्यातील सोमेश्वर-तळे येथे मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार २ जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आदेश दत्ताराम घडशी ( १७, रा. देवरुख- ता. संगमेश्वर) असे या तरुणाचे नाव आहे.

आदेश सोमवारी आपल्या मित्रांसोबत रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर तळे या ठिकाणी पोहण्यासाठी आला होता. दुपारी तीनच्या सुमारास आदेश तळ्यामध्ये पोहण्यास उतरला. पोहताना अचानक तो पाण्यात गंटागळ्या खाऊ लागला. तो पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच त्यांच्या मित्रांनी आरडा-ओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आसपासचे लोक धावून आले आणि त्यांनी आदेशला वाचविण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या. मात्र तोपर्यत आदेश पाण्याच्या तळाशी जाऊन पोहचला होता.

सोमेश्वरच्या स्थानिक तरुणांनी आदेशला पाण्यातून बाहेर काढले आणि बेशुद्धावस्थेतच त्याला उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत आदेशची प्राणज्योत मालवली होती. या घटनेची नोंद ग्रामीण पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.

Web Title: A young man drowned in a lake while swimming in Ratnagiri