दापोली : मूळचा दापोली तालुक्यातील रहिवासी असलेला आणि सध्या विरारमध्ये राहणाऱ्या एका भजन, कीर्तनात रमणाऱ्या भोंदूने आपल्या नातेवाईक असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. डिसेंबर २०२५ मध्ये घडलेल्या या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर या भोंदूविरुद्ध पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असला तरी अजूनही त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.पीडित मुलगी लग्नासाठी म्हणून दापोली तालुक्यातील आपल्या गावी आली होती. लग्नानंतर मी तुला घरी सोडतो, असे सांगून या भोंदूने तिला आपल्यासोबत विरारला नेले. नातेवाईक असल्याने ती त्याच्यासोबत गेली. मात्र, त्याने तेथे तिचा विनयभंग केला. याबाबत तिने घरी सांगणार असल्याचे सांगताच त्याने तिची माफी मागितली. त्यानंतर त्याने पुन्हा तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. १ डिसेंबर आणि २ डिसेंबर २०२५ रोजी आपला विनयभंग झाल्याचे तिने १५ डिसेंबर रोजी विरार पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.विरार पोलिसांनी त्या भोंदूविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ अंतर्गत कलम ७४, ११५(२), ३५१(२) तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) अंतर्गत कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अजूनही या भोंदूविरोधात कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे पीडितेच्या पालकांचे म्हणणे आहे. त्यांनी विरार पोलिसांची भेट घेऊन लवकरात लवकर कारवाईची मागणीही केली आहे. नाशिकच्या खरात प्रकरणामुळे या भोंदूच्या कृत्याची चर्चाही दापोली तालुक्यात होत आहे.
Web Summary : A minor girl was molested by a relative in Virar. Despite filing a POCSO case three months ago, no action has been taken against the accused. The parents have appealed to the police for swift action.
Web Summary : विरार में एक नाबालिग लड़की के साथ एक रिश्तेदार ने छेड़छाड़ की। तीन महीने पहले पॉक्सो का मामला दर्ज होने के बावजूद, आरोपी के खिलाफ कोई कार्रवाई नहीं की गई है। माता-पिता ने पुलिस से त्वरित कार्रवाई की अपील की है।