Ratnagiri: ‘रो-रो’वरील कलंडलेला ट्रक पडता-पडता वाचला, लोकोपायलटच्या जागरूकतेमुळे अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 15:42 IST2026-01-03T15:41:34+5:302026-01-03T15:42:44+5:30

या घटनेमुळे कोकण रेल्वेच्या प्रवासी किंवा इतर रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती कोकण रेल्वेच्या सूत्रांकडून देण्यात आली

A cargo truck on the Ro Ro service running on the Konkan railway line tilted to one side | Ratnagiri: ‘रो-रो’वरील कलंडलेला ट्रक पडता-पडता वाचला, लोकोपायलटच्या जागरूकतेमुळे अनर्थ टळला

Ratnagiri: ‘रो-रो’वरील कलंडलेला ट्रक पडता-पडता वाचला, लोकोपायलटच्या जागरूकतेमुळे अनर्थ टळला

खेड : कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या रो-रो सेवेतील एक मालवाहू ट्रक एका बाजूला कलंडल्याचे लाेकाे पायलटच्या लक्षात आले. त्यानंतर ही गाडी खेड रेल्वेस्थानकात थांबवून हा ट्रक पुन्हा बांधण्यात आला. लाेकाे पायलटच्या जागरूकतेमुळे हा ट्रक खाली पडता-पडता वाचला. अन्यथा माेठा अनर्थ घडला असता. ही घटना शुक्रवार, २ जानेवारी राेजी दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान घडली.

काेकण रेल्वेमार्गावरून कोलाड येथून मडगावकडे मालवाहू ट्रक घेऊन रो-रो शुक्रवारी जात हाेती. रो-रो सेवेमधील एक मालवाहू ट्रकवरील लोड एका बाजूला सरकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ट्रकही थाेडासा एका बाजूला कलंडला हाेता. हा प्रकार लाेकाे पायलटच्या लक्षात आला. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ही रेल्वे तत्काळ थांबवण्यात आली. ट्रक कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने प्रसंगावधान राखत तत्काळ सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या.

घटनास्थळी ट्रकमधील माल पुन्हा व्यवस्थित ठेवण्याचे काम उशिरापर्यंत सुरू हाेते. सेफ्टी बेल्ट लावून ट्रक सुरक्षित करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. या घटनेमुळे कोकण रेल्वेच्या प्रवासी किंवा इतर रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याची माहिती कोकण रेल्वेच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.

सर्व सुरक्षा उपाय पूर्ण झाल्यानंतर आणि मालवाहू ट्रक पूर्णपणे सुरक्षित केल्यानंतर रो-रो सेवा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title : रत्नागिरी: सतर्क लोको पायलट ने रो-रो पर झुके ट्रक को बचाया।

Web Summary : रत्नागिरी में एक लोको पायलट की सतर्कता से बड़ा हादसा टल गया। रो-रो सेवा पर एक ट्रक झुक गया, लेकिन पायलट ने खेड़ स्टेशन पर ट्रेन को रोक दिया, जिससे वह गिरने से बच गया। सुरक्षा उपाय किए गए, और ट्रक को सुरक्षित करने के बाद रो-रो सेवा फिर से शुरू हुई। रेल यातायात अप्रभावित रहा।

Web Title : Alert loco pilot saves tilted truck on Ro-Ro in Ratnagiri.

Web Summary : A loco pilot's alertness averted a major accident in Ratnagiri. A truck on a Ro-Ro service tilted, but the pilot stopped the train at Khed station, preventing it from falling. Safety measures were taken, and the Ro-Ro service resumed after securing the truck. Rail traffic remained unaffected.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.