शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

७९व्या वर्षातही त्यांना शेतीचीच ओढ

By admin | Updated: July 8, 2014 00:17 IST

शेतीवरचे आपले प्रेम जराही कमी केलेले नाही

समीर चांदोरकर ल्ल सापुचेतळेमाजी पोलीसपाटील बाबल्या महादेव बनकर यांनी वयाच्या ७९व्या वर्षी शेतीवरचे आपले प्रेम जराही कमी केलेले नाही. अडीच एकर क्षेत्रात वयाच्या १४व्या वर्षापासून त्यांनी प्रयोग सुरु केले. आज सापुचेतळे चांदोर भागात कृषी क्षेत्रातील जाणकार अशी प्रतिमा त्यांनी तयार केली.जेमतेम पाचवीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे भावंडांचा शिक्षणाचा खर्चही पेलवत नसल्याने त्यांच्यापुढे आव्हान उभे राहिले. हे आव्हान कसे पेलायचे, हा प्रश्न उभा राहिल्याने त्यांनी शेतीत आपले मन रमवले. प्रचंड मेहनत घेतली व यशस्वी शेतकरी म्हणून प्रतिमा तयार केली. अडीच एकराची भातशेती आहे. त्यातून ५ खंडीपर्यंत उत्पन्न दरवर्षी घेतले जाते. शेतात राबण्यासाठी तीन मुलांसह पत्नीचाही आधार मिळत असल्याचे सांगतात. शिक्षक असलेला मुलगा यशवंत सुटीच्या दिवशी शेतीसाठी गावाकडे येतो अन् शेतीत मदत करतो.बाळकृष्ण व पांडुरंग हे जे. के.मधील कर्मचारी होते. यांनीही शेतात मदत सुरु केली. विद्यमान सरपंच वैशाली बनकर यांनाही शेतीची आवड असल्याने हे संपूर्ण कुटूंब शेतात रमले आहे. यावर्षी १३० दिवसात बहरणारी सोना, रुपाली, सारभी, क्रांती या बियाण्यांची त्यांनी पेरणी केली. २ मणाचा पेरा दरवर्षी लागतो. मात्र, आजच्या कठीण परिस्थितीत स्वत:चे जोत असल्याने शेतीच्या मशागतीची कामे करण्यास स्वावलंबन उपयोगी ठरते. दिवसेंदिवस जनावरे बाळगणे कठीण होत असल्याने पुढील वर्षापासून शेतीत आधुनिक अवजारांचा वापर करण्यावर त्यांनी भर देण्याचे ठरविले आहे. बनकर यांना शेतीत या वयातही प्रयोग करून उत्पन्न वाढवावे, असे वाटते. त्यासाठी ते झटत आहेत. या वयातील त्यांचा आदर्श वाखाणण्यासारखा आहे.